Vegetables 
ॲग्रो विशेष

Vegetable Cultivation : चांगल्या पाऊसमानामुळे भाजीपाला लागवड वाढली

Team Agrowon

Nagar News : जिल्ह्यात यंदा पावसाच्या चांगल्या स्थितीमुळे जिल्हाभरात भाजीपाल्याची लागवड वाढली आहे. खरीप हंगामात सुमारे तीस हजार हेक्टरवर भाजीपाला लागवड झाल्याचे अंतिम अहवालात निश्‍चित झाले आहे. रब्बीतही भाजीपाला लागवड वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पाथर्डी, राहाता तालुक्यात यंदा बटाटे लागवडीलाही शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. एकट्या पारनेर तालुक्यात जिल्ह्यातील क्षेत्रामधील पन्नास टक्के भाजीपाला आहे. नगर जिल्ह्यातील पारनेर, संगमनेर, अकोले, राहाता, राहुरी, कोपरगाव भागात भाजीपाला उत्पादनाला अधिक प्राधान्य दिले जाते. संगमनेर, अकोले, पारनेरमध्ये टोमॅटोचे उत्पादन अधिक घेतले जाते.

यंदा सुरुवातीपासूनच पावसाची स्थिती चांगली आहे. त्यामुळे यंदा भाजीपाला उत्पादन घेण्याला शेतकऱ्यांनी अधिक प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी साधारण पंधरा ते वीस हजार हेक्टरपर्यंत जिल्हाभरात भाजीपाला असतो. यंदा खरिपात जिल्हाभराचे भाजीपाल्याचे क्षेत्र सुमारे ३० हजार आहे.

त्यात अर्धे म्हणजे सुमारे चौदा हजार हेक्टर क्षेत्र पारनेरमध्ये असून संगमनेरमध्ये सहा हजाराच्या वर क्षेत्र आहे. पाथर्डी, राहाता तालुक्यातील काही भागांत बटाटा उत्पादनाला प्राधान्य दिले जाते. यंदा अधिक प्रमाणात बटाटा लागवड होणार असल्याचे दिसतेय. खरिपात कांद्याचेही क्षेत्र दरवर्षीपेक्षा अधिक म्हणजे ३४ हजार होते. आता रब्बीतही कांदा लागवड वाढेल असे दिसतेय.

भाजीपाल्याचे खरिपातील क्षेत्र (हेक्टरमध्ये)

नगर ः ११४७, पारनेर ः १४ हजार ३७३, श्रीगोंदा ः १२३४, कर्जत ः १०१६, जामखेड ः ४२८, शेवगाव ः ४४८, पाथर्डी ः २२८, नेवासा ः ३८२, राहुरी ः ४४१, संगमनेर ः ६४४६, अकोले ः १२९०, कोपरगाव ः ५८६, श्रीरामपूर ः ३४२, राहाता ः ८४६.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कापसाच्या भावात चढ उतार सुरुच; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत ज्वारीचे दर?

Ghatkhed KVK : घातखेड ‘केव्हीके’चे तंत्रज्ञान विस्तारात मोठे योगदान

Chana Cultivation : हरभऱ्याच्या भरघोस उत्पादनासाठी महत्वाच्या तीन गोष्टी

Agriculture Award : सात जणांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव

Agro Business: तरुणांनी कृषिपूरक व्यवसायाकडे वळावे

SCROLL FOR NEXT