Wild Vegetable : ‘खरपुड’ला रंगणार रानभाज्यांचा सोहळा

Ranbhaji Mahotsav : नैसर्गिक, शुद्ध, सात्त्विक व बहुगुणी स्रोत असलेल्या रानभाज्यांच्या पोषणमुल्यांचे महत्व पटवून देत त्यांच्या जतन व संवर्धनाला चालना दण्यासाठी येत्या रविवारी (ता. २९) खरपूड (ता. खेड, पुणे) येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
Ranbhaji Mahotsav
Ranbhaji MahotsavAgrowon
Published on
Updated on

Bhimashankar News : नैसर्गिक, शुद्ध, सात्त्विक व बहुगुणी स्रोत असलेल्या रानभाज्यांच्या पोषणमुल्यांचे महत्व पटवून देत त्यांच्या जतन व संवर्धनाला चालना दण्यासाठी येत्या रविवारी (ता. २९) खरपूड (ता. खेड, पुणे) येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

खरपुड, म्हसेवाडी, भोरगिरी, भोमाळे (वरचे), येळवली, भिवेगाव व भोमाळे (खालचे) या भिमाशंकर अभयारण्यातील सात गावांतील १५० हून अधिक महिला या महोत्सवात रानभाज्यांच्या पाककृती सादर करणार आहेत. उपस्थितांना विविध प्रकारच्या रानभाज्यांचा आस्वाद घेण्याबरोबरच रानभाज्यांविषयी माहिती देऊन त्यांच्या जतन व संवर्धन चळवळीस हातभार लावता येईल, अशी माहिती उपक्रम प्रमुख प्रदीप चव्हाण यांनी दिली.

Ranbhaji Mahotsav
Wild Vegetables : कोल्हापुरात रानभाज्यांचा खजिना, जोतिबा डोंगरावर ४७ हून अधिक औषधी रानभाज्या आढळल्या

ग्रामपंचायत खरपूड, वनश्री महिला ग्रामसंघ, कल्पवृक्ष, बाएफ, शिवनेरी ट्रेकर्स असोसिएशन, पंचायत समिती खेड व एस.एम.सुपे मेमोरियल फाऊंडेशन या संस्थांनी संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन केले आहे.

Ranbhaji Mahotsav
Wild Vegetables : डोंगरी भागात रानभाज्यांना बहर, महिलांना मिळतोय आर्थिक आधार

विक्री नव्हे तर जतन संवर्धन

वनक्षेत्रातून अतिरेकी संकलन झाल्याने अनेक औषधी वनस्पती व रानभाज्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे या महोत्सवात रानभाज्या विक्रीवर बंदी आहे. रानभाज्यांचा स्वाद अनुभव आणि जतन संवर्धनसाठीचे उपक्रम हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. सहभागी महिलांमार्फत रानभाजी जतन संवर्धनाच्या प्रतिज्ञेसोबतच आदिवासी कुटुंबांना रानभाज्यांचे बियाणे वितरित करण्यात आहे.

आगळेवेगळे रानभाजी टेस्टिंग

महिलांनी बनवलेल्या सुमारे ४० प्रकारच्या रानभाज्या टेबलवर रांगेत मांडलेल्या असतील. सोबत नाचणी, तांदळाच्या भाकरी असतील. सहभागी व्यक्तींना एकेका रानभाजीची चव व माहिती घेत पुढे पुढे सरकत महोत्सवाचा आस्वाद घेता येईल. यानंतर स्वतंत्र भोजन पंगतीत आदिवासींच्या पारंपरिक जेवणाचा आनंद घेता येईल. एकूणच भिमाशंकर अभयारण्याच्या कुशीतील रानभाज्यांचा स्वाद व पारंपरिक आदिवासी जेवणाचा मनमुराद आस्वाद असे स्वरूप आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क

प्रदीप चव्हाण - ९४०३१६०६०५, सुभाष डोळस - ९४०५४३८१८०, संतोष मदणे - ९९२२७३०९०२.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com