Water Scarcity Agrowon
ॲग्रो विशेष

Water Shortage : धुळे जिल्ह्यात पाणीटंचाईचा भाजीपाला पिकांना फटका

Vegetables Crop Hit : तलाव, बंधाऱ्यांसह विहिरी व कूपनलिका आटल्याने ही परिस्थिती उद्‍भवली आहे. त्यामुळे शेतीतील उलाढाल शून्यावर आली आहे.

Team Agrowon

Dhule News : बोर, पपई, टरबूज आदींसह विविध फळबागांसाठी खानदेशात अग्रेसर, राज्यातच नव्हे तर परराज्यांत फळे विक्रीस नेणारे निकुंभे (ता. धुळे) येथे यंदा प्रथमच एकाही शेतात फळबाग नाही. तलाव, बंधाऱ्यांसह विहिरी व कूपनलिका आटल्याने ही परिस्थिती उद्‍भवली आहे. त्यामुळे शेतीतील उलाढाल शून्यावर आली आहे. गावाला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

एकता व सहकार्याची जोड यातून स्वतःबरोबरच गावाचाही विकास साधणारे निकुंभेने अवघ्या खानदेशला शेतीतून समृद्धी मिळविण्याचा मार्ग दाखविला. संपूर्ण शेतकरी कुटुंबे असलेल्या या गावाने श्रमदानातून दोनशेहून अधिक बंधारे बांधून पाणी अडविले होते. निकुंभे चार हजार लोकवस्तीचे गाव आहे.

या गावाने सामाजिक ऐक्य टिकवून ठेवल्याने ग्रामपंचायत स्थापनेपासून म्हणजे सुमारे ७० वर्षांपासून ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी, दूध संघ या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. तंटामुक्तीचे बक्षीस गावाने मिळविले आहे. गावाजवळ धरण वा तलाव नाही; परंतु त्याची कसर ग्रामस्थांनी बंधारे बांधून भरून काढली. गावाजवळ काही टेकड्या आहेत.

या गावाने सामाजिक ऐक्य टिकवून ठेवल्याने ग्रामपंचायत स्थापनेपासून म्हणजे सुमारे ७० वर्षांपासून ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी, दूध संघ या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. तंटामुक्तीचे बक्षीस गावाने मिळविले आहे. गावाजवळ धरण वा तलाव नाही; परंतु त्याची कसर ग्रामस्थांनी बंधारे बांधून भरून काढली. गावाजवळ काही टेकड्या आहेत.

त्यावरून वाहणारे पाणी वाया जाऊ नये म्हणून ग्रामस्थांनी श्रमदान करून बंधारे बांधले. ‘पाणी अडवा- पाणी जिरवा’ मोहिमेअंतर्गत पाटबंधारे विभागानेही त्यात काहीशी भर घातल्याने दोनशेहून अधिक बंधारे बांधून पाणी जिरविले आहे. शेकडो शेततळेदेखील बांधले आहेत. मात्र यंदा प्रथमच निसर्गाची वक्रदृष्टी गावावर पडली आहे. गावात ९० टक्के शेतकऱ्यांनी फळबाग योजनेचा लाभ घेतला असून, पपई, बोर, डाळिंब, केळी, ऊस, सीताफळ आदींचे उत्पादन घेतले जाते.

एकही नवी फळबाग लागवड नाही

सीजनमध्ये बोरांच्या रोज दोन-तीन गाड्या भरून बोर विक्रीस नेल्या जात. दारिद्र्यरेषेखाली असणारे गाव फळबागांमुळे समृद्ध झाले. लोकवर्गणीतून मंदिर व डिजिटल शाळा झाली. गेल्या वर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने एकाही शेतकऱ्याने फळबाग लावली नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. पाणीटंचाईप्रश्‍नी उपाययोजना म्हणून दोन कूपनलिका बसविण्यात आल्या. त्यातून सार्वजनिक विहिरीत पाणी टाकण्यात आले. त्यामुळे टंचाई काहीशी कमी झाली असली तरी सध्या आठ दिवसांआड पाणी मिळते, असे दादाभाई पाटील यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Price Issue: कापसाचे दर पडण्यास शासन जबाबदार

Banana Price: गुणवत्ता निकषावर मालाला मिळणार दर

Agriculture Technology: नव्या तंत्रज्ञानामुळे देशात कृषी क्षेत्रात क्रांती

Global Sugar Production: जागतिक बाजारात साखर पुरवठा वाढणार

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

SCROLL FOR NEXT