Mango Variety Agrowon
ॲग्रो विशेष

Sindoor Mango: ‘वरपुड सिलेक्शन-१’ आंब्याचे नामकरण ‘सिंदूर’

Mango Variety: परभणी जिल्ह्यातील वरपुड गावातील शेतकरी संशोधक चंद्रकांत देशमुख यांनी विकसित केलेल्या ‘वरपुड सिलेक्शन - १’ या आंबा वाणाचे ‘सिंदूर’ असे नामकरण करण्यात आले आहे. हा आंबा वाण नैसर्गिक शेतीतून मिळवलेला असून त्याला स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळत आहे.

माणिक रासवे : अॅग्रोवन वृत्तसेवा

Parbhani News: परभणी जिल्ह्यातील वरपुड (ता. परभणी) येथील प्रगतिशील संशोधक शेतकरी चंद्रकांत देशमुख यांनी विकसित केलेल्या आंब्याच्या ‘वरपुड सिलेक्शन - १’ या वाणाचे सिंदूर असे नामकरण करण्यात आले आहे. या वेळी नागपूर येथील राष्ट्रीय सेंद्रिय व नैसर्गिक शेती संशोधन केंद्राचे प्रादेशिक संचालक डॉ. अजय सिंह राजपूत यांची उपस्थिती होती.

चंद्रकांत देशमुख यांनी २०२३ पासून आंबा फळ पिकांवर लक्ष केंद्रित केले आहे. दोन एकरांवर आंब्याच्या देशी तसेच विदेशी ५५ वाणांची लागवड केली आहे. नैसर्गिक पद्धतीने आंबा उत्पादन घेत आहेत.

संशोधनातून त्यांनी आंब्याचा ‘वरपुड सिलेक्शन- १’ हा वाण विकसित केला आहे. या वाणाचे नामकरण डॉ. अजय सिंह राजपूत यांच्या उपस्थितीत ‘सिंदूर’ असे करण्यात आले आहे. याबद्दल इंदूर (मध्य प्रदेश) येथील समारंभात चंद्रकांत देशमुख यांचा सन्मान करण्यात येणार आहे. वरपुडकर म्हणाले, की या वाणांच्या आंब्याचा रंग आकर्षक आहे.

विशिष्ट चव आणि गोडवा आहे. अत्यंत लहान कोय आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

स्थानिक व राष्ट्रीय बाजारात सेंद्रिय उत्पादनांना मोठी मागणी असून योग्य मार्गदर्शन व बाजारपेठेची जोड मिळाल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न निश्‍चितच वाढू शकते. शेतकऱ्यांना उच्च प्रतीचे वाण अत्यंत कमी दराने किंवा मोफत मिळाले तर त्यांच्या जीवनात सामाजिक व आर्थिक बदल घडवता येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Adulteration: भेसळयुक्त दूध आरोग्यासाठी धोकादायक; घरच्या घरी तपासा दुधातील भेसळ

River Linking Project: दुष्काळमुक्तीकडे वाटचाल, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला ७८ टीएमसी पाणी मिळणार- मुख्यमंत्री फडणवीस

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार, कापूस स्थिर, टोमॅचो आवक सुधारली, डाळिंबाला उठाव, मिरचीला उठाव टिकून

Land Acquisition: ‘शक्तिपीठ’साठी पारदर्शक भूसंपादन हवे

NA Permission Rule: शेतजमिनीवर घर बांधण्यासाठी ‘NA’ परवानगीची अट रद्द ; राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT