Natural Farming : शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे

Organic Farming : नैसर्गिकरित्या पिकविलेले अन्न मानवी आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असते. यासाठी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळले पाहिजे.
Natural Farming
Natural Farming Agrowon
Published on
Updated on

Nanded News : नैसर्गिकरित्या पिकविलेले अन्न मानवी आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असते. यासाठी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळले पाहिजे. राज्य शासनही नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देत आहे.

नांदेड जिल्ह्यात काही शेतकरी नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून ध्येय साध्य करताना दिसत आहेत, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले. कृषी विभाग व आर्या नैसर्गिक शेती यांच्या संयुक्त विद्यमानाने विविध कृषी विषयक योजनेचा शुभारंभ व पीक पाहणी कार्यक्रम दापशेड (ता. लोहा) येथील विश्वनाथ होळगे यांच्या आर्या नैसर्गिक शेतीमध्ये पार पडला.

यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, आत्माच्या प्रकल्प उपसंचालक अर्चना गुंजकर, पोखर्णी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख, लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर, लोहा तालुका कृषी अधिकारी सदानंद पोटपेलवार, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन सोहेल, प्रगतिशील शेतकरी गोविंदराव होळगे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Natural Farming
Natural Farming : पालघरची नैसर्गिक शेतीकडे वाटचाल

प्रारंभी विश्वनाथ होळगे यांनी आर्या नैसर्गिक शेतीमधील गेल्या दहा वर्षापासूनचे अनुभव व्यक्त केले. जिल्हाधिकारी अभिजित राऊत म्हणाले, की विश्वनाथ होळगे यांच्या शेतीला गेले अनेक दिवस झाले भेट द्यायची इच्छा होती. आर्या नैसर्गिक शेतीचे कार्य जिल्हा, राज्य तथा देशपातळीवर गेले आहे.

Natural Farming
Natural Farming : शेतीसह काळ्या आईलाही केले श्रीमंत

विश्वनाथ होळगे यांच्या सेंद्रिय शेतीबद्दल मी ऐकलं आहे. त्यांच्या शेतीबद्दल इतर शेतकऱ्यांना प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी यांचे उदाहरण देत असतो. विश्वनाथ होळगे यांच्या पाठीशी सदैव प्रशासन राहील, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

अभिजित राऊत यांनी सायंकाळी सातपर्यंत आर्या नैसर्गिक शेतीमध्ये रमले. त्यांनी नैसर्गिक शेतीत पिकविलेल्या सर्व पिकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी जीवामृत, घनामृत, दशपर्णी अर्क या सेंद्रिय निविष्ठांच्या उत्पादनाविषयी माहिती घेतली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com