Farmer Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Protest : शेतकरी आक्रोश मोर्चाद्वारे मुख्यमंत्र्याकडे विविध मागण्या

Amravati drought : अमरावती जिल्ह्यात सततच्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

Team Agrowon

Amravati News : अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी व सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी संकल्प बहुउद्देशीय संस्थेमार्फत मंगळवारी (ता. २९) शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे विविध मागण्या करण्यात आल्या असून हे निवेदन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना देण्यात आले.  या मागण्या तातडीने सोडविण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

अमरावती जिल्ह्यात सततच्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल आहे. यातून मार्ग काढण्यासाठी तातडीने भरीव मदत देणे आवश्यक आहे. याकरिता कोरडवाहू शेतकऱ्यांना किमान ५० हजार एकरी (दोन हेक्टर मर्यादा) मदत द्यावी, वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, कोरडवाहू शेतीला कुंपण घालण्यासाठी १०० टक्के अनुदानाची योजना सरसकट राबविण्यात यावी, नुकसानभरपाई १५ दिवसांत देण्याचा शासन निर्णय घ्यावा, जिल्ह्यातील शेतीला २४ तास विद्युत पुरवठा होणे गरजेचे आहे, पाणंद रस्ता योजना आणखी प्रभावीपणे राबविण्यात यावी, अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फूल उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक स्वतंत्र व्यवस्था (मार्केट) निर्माण करावी, ग्रामीण भागात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वाढवावी, अतिवृष्टीग्रस्तांना शासनाकडून आवश्यक ती मदत तातडीने देण्यात यावी आदी मागण्यात करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर नितीन कदम, परवेश कदम, ज्ञानेश्वर झोंबाडे, स्वप्नील मालधुरे यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT