Banana Variety Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Variety : करमाळ्यात पिकतेय व्हॅनिला आइसक्रीम फ्लेव्हरची केळी

Banana Production : वाशिंबे (ता. करमाळा) येथील तरुण शेतकरी अभिजित पाटील यांनी व्हॅनिला आइस्क्रीमचा फ्लेव्हरच्या ‘ब्लू जावा’ केळीचा प्रयोग केला आहे.

सुदर्शन सुतार

Solapur News : वाशिंबे (ता. करमाळा) येथील तरुण शेतकरी अभिजित पाटील यांनी व्हॅनिला आइस्क्रीमचा फ्लेव्हरच्या ‘ब्लू जावा’ केळीचा प्रयोग केला आहे. मध्यम आकारातील या केळीचा रंग निळसर असल्याने त्या लक्ष वेधतातच, पण नैसर्गिकरीत्या गोड आणि व्हॅनिला आइसक्रीमसारखी चव या केळीला आहे. त्यामुळे आइस्क्रीम केळी म्हणूनही तिची ओळख आहे. गेल्याच आठवड्यात या केळीला पुण्याच्या बाजारात प्रतिकिलो १०० रुपयांपर्यंतचा दर मिळाला आहे.

श्री. पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून केळी उत्पादनात आहेत. आजही येल्लकी (येलची), रेड बनाना, जी-९ अशा विविध वाणांची २६ एकर केळी त्यांच्याकडे आहे. त्यात आता या नावीन्यपूर्ण केळीची नव्याने भर पडली आहे. गेल्यावर्षी दोन एकरांवर त्यांनी या केळीची लागवड केली.

प्रामुख्याने व्हिएतनाम, फिलिपिन्स, अमेरिका या देशात या केळीचे उत्पादन घेतले जाते. आइसक्रीमसह प्रामुख्याने फूडप्रोसेसिंग व्यवसायात या केळीला सर्वाधिक मागणी आहे. या केळीची वैशिष्ट्ये ऐकून अभिजित यांनी एका खासगी रोपवाटिकेद्वारे परदेशातूनच ही रोपे मागवून गेल्यावर्षी त्याची लागवड केली.

दोन एकरात साधारण २६०० रोपे लागली. आता उत्पादन सुरू झाले आहे. त्यांनी नुकतीच ५० किलो केळी पुण्यात पाठविली. त्यावेळी प्रतिकिलोला ९० ते १०० रुपयांचा दर मिळाला. येत्या आठवड्यात केळीचा हा संपूर्ण प्लॅाट कापणीला येणार आहे. पण आतापासूनच व्यापारी आणि कार्पोरेट मॅालकडून या केळीसाठी आगाऊ मागणी नोंदवली जात आहे.

‘ब्लू जावा’ केळीची वैशिष्ट्ये...

- ही केळी जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरने समृद्ध

- ही एक अपवादात्मक विविधता असणारी जात

- आकार मध्यम, तर निळसर रंग

- नैसर्गिकरित्या तिची गोड चव आणि मलईदार गरामुळे वेगळी अनुभूती

- एका घडाचे वजन १६ ते १८ किलोपर्यंत

- एकरी १८ टनापर्यंत उत्पादन

परदेशातील माझ्या एका मित्राकडून या वाणाची माहिती मिळाली. व्हिएतनाम, फिलिपिन्स आणि अमेरिकेत ही केळी अधिक पिकते. माहिती घेऊन लागवडीचा निर्णय घेतला. यंदा ती फळाला आली. फूडप्रोसेसिंग आणि आइसक्रीमसाठी तिचा उपयोग होतो. काही व्यापारी, मॅालशी दराची बोलणी सुरू आहे. प्रतिकिलो किमान १०० ते १५० रुपयांपर्यंत दर मिळेल, अशी अपेक्षा आहे.
- अभिजित पाटील, केळी उत्पादक, वाशिंबे, ता. करमाळा, जि. सोलापूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Scheme : बिगर कर्जदार शेतकऱ्यांना विमा अर्जासाठी अंतिम मुदत

Crop Insurance Payment : विमा परतावा खात्यात जमा होण्यास नांदेडमध्ये सुरुवात

NAFED Onion Scam : कांदा उत्पादकांना न्याय मिळेपर्यंत लढा देणार

Rain Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे जोरदार कमबॅक

Kharif Sowing : सोयाबीन, सूर्यफूल क्षेत्रात घट

SCROLL FOR NEXT