Maharashtra Assembly Elections 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Election 2024 : ऊस उत्पादकांच्या मतांना निवडणुकीत आला भाव

Sugarcane Farmer : बहुतांश सर्व आमदार हे साखर कारखानदारीशी संबंधित आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ऊस उत्पादकांच्या मतांवर उमेदवारांनी आपल्या मताधिक्याचे गणित बांधले आहे.

Team Agrowon

Satara News : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघांत चुरशीच्या लढती होत आहेत. प्रमुख नेत्यांच्या जाहीर सभांनंतर त्या-त्या मतदार संघांतील प्रचारातील चुरस वाढू लागली आहे. ऐन ऊस गळीत हंगामाच्या तोंडावर होत असलेल्या या निवडणुकीत साखरपट्ट्यातील मतदारांची मते निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे या ऊस उत्पादक मतदारांना या वेळेस भाव आला आहे.

बहुतांश सर्व आमदार हे साखर कारखानदारीशी संबंधित आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ऊस उत्पादकांच्या मतांवर उमेदवारांनी आपल्या मताधिक्याचे गणित बांधले आहे. साखरपट्ट्यातील मतदार कोणाला आमदार करणार याची उत्सुकता आहे.

जिल्ह्यात आठ सहकारी व नऊ खासगी साखर कारखाने आहेत. या कारखान्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात प्रत्येक वर्षी एक कोटीपेक्षाही अधिक क्विंटल साखरनिर्मिती होते. तेवढेच टन उसाचे गाळप होते.

त्यामुळे साखर कारखानदारीशी संबंधित ऊस उत्पादकांची मते महत्त्वपूर्ण आहेत. कारखान्यांचे हंगाम सुरू होण्याचा कालावधी आणि विधानसभेची निवडणूक एकच गाठ पडली आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांची मते यावेळेस महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. आठही विधानसभा मतदार संघांत साखर कारखानदार असलेले उमेदवार रिंगणात आहेत.

यामध्ये विद्यमान आमदारांमध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले, बाळासाहेब पाटील, शंभूराज देसाई, मकरंद पाटील यांचा समवेश आहे. आमदार रामराजे नाईक निंबाळकर व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे जरी प्रत्यक्ष रिंगणात नसले, तरी फलटणमध्ये त्यांच्या माध्यमातून उभ्या असलेल्या उमेदवारांसाठी त्यांच्या साखर कारखानदारीशी संबंधित मते महत्त्वपूर्ण असणार आहेत.

याबरोबरच उमदेवार अतुल भोसले, प्रभाकर घार्गे, मनोज घोरपडे हेही रिंगणात आहेत. त्यामुळे त्यांच्या कारखान्यांच्या ऊस उत्पादक सभासदांकडून त्यांना अपेक्षित मते मिळण्याची आशा आहे.

त्यासाठी त्यांनी आगामी हंगाम डोळ्यासमोर ठेवून ऊसदराचा मुद्दा आता तरी बाजूला ठेवला असला, तरी पुढे हा मुद्दा सोपा होण्यासाठी दोघांकडूनही एकमेकांविषयी अपेक्षा आहेत. एकूणच आठही मतदार संघांत असलेल्या साखरपट्ट्यातील मतांची गणिते जुळवून मताधिक्य घेण्याची तयारी या नेत्यांनी केली आहे. आत या मतांच्या माध्यमातून कोण विधानसभेत जाणार याची उत्सुकता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

Farm Equipment: मुरुडमध्ये अल्पभूधारकांना कृषी अवजारांचे वाटप

Ahilyanagar Agro Tourism : अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कृषी पर्यटनाची निर्मिती करा

Research Paper Award: श्रीशैल्य हेगान्ना यांना रिसर्च अवॉर्ड

SCROLL FOR NEXT