Cotton Processing Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Processing : मिरवणूकीतून वाजतगाजत कापूस प्रक्रियेचा संदेश

Nagpur News : खरसोली फार्मर प्रोड्युसर कंपनीचा अभिनव उपक्रम

Team Agrowon

ऍग्रोवन वृत्तसेवा
Smart Cotton Project : नागपूर ः ‘स्मार्ट कॉटन प्रकल्प’ अंतर्गत कापसाच्या मूल्यवर्धनाला प्रोत्साहन दिले जात आहे. यातून चांगला परतावा मिळणार आहे. या उपक्रमाला बळ मिळण्यासाठी खरसोली फार्मर प्रोड्युसर कंपनीतर्फे प्रक्रियेकामी जिनिंगला ११ वाहनांतून कापूस नेत अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

या वेळी गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. शेतकऱ्यांनी फेटे बांधत, गुलाल उधळत रॅलीत सहभाग घेतला. त्यानंतर जल्लोषात कापसाचा जिनिंगला पुरवठा करण्यात आला.
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पा अंतर्गत मूल्य साखळीद्वारे नरखेड तालुक्‍यातील खरसोली गावात ‘एक गाव एक वाण’ या संकल्पनेवर कापसाची लागवड करण्यात आली.

त्यानंतर आता या कापसावर प्रक्रिया करून गाठी तयार करण्यात येणार आहेत. या तयार गाठींची विक्री शेतकरी कंपनीमार्फत ‘महाकॉट’ ब्रॅण्डने केली जाईल. ५५० क्‍विंटल कापसापासून १०० गाठींचा एक लॉट तयार करण्यात येणार आहे.

नरखेड तालुक्‍यात पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम खरसोली फार्मर प्रोड्युसर कंपनीतर्फे राबविण्यात आला. सभासदांव्दारे ओमकार जिनिंग (मोगरा) येथे या कापसावर प्रक्रिया केली जाईल. ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक डॉ. अर्चना कडू यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

नरखेडचे तालुका कृषी अधिकारी कुणाल ठाकूर यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबविण्यात आला. माजी सभापती नरेश अरसडे, सरपंच नीलिमा अरसडे, नोडल अधिकारी अरविंद उपरिकर, तहसीलदार कुशल जैन, ‘आत्मा’चे उपसंचालक पल्लवी तलमले, प्रदीप उंबरकर, नीलेश रिधोरकर, अंकुश नांदूरकर उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Budget 2026: कोरडवाहू शेतीत कृषी संलग्न व्यवसायाला चालना

Agri Union Budget 2026: अन्नदाता शेतकऱ्यांचा भ्रमनिरास

Union Budget 2026: शेती बेदखलच!

Union Budget 2026: आर्थिक वाढीसाठी सर्वंकष प्रयत्नांचा संकल्प

Agriculture Union Budget: अन्नदाता शेतकरी पुन्हा एकदा वाऱ्यावर...!

SCROLL FOR NEXT