Eknath Shinde  Agrowon
ॲग्रो विशेष

Eknath Shinde : शेतीमालाचे मूल्यवर्धन, विपणनासाठी प्रशिक्षण, विक्री केंद्र उपयुक्त ठरेल

Team Agrowon

Washim News : शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतीमाल विक्री केंद्र स्थानिक शेतीमालाचे विपणन व मूल्यवर्धनासाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

वाशीम येथे या केंद्राचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, खासदार भावना गवळी, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार ॲड. किरण सरनाईक, महादेव जानकर, गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., पोलीस अधीक्षक अनुज तारे, विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा, ‘आत्मा’प्रकल्प संचालक अनिसा महाबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘शेतीच्या विकासासाठी व शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी एक रुपयांत पीकविमा, शेतकरी सन्मान योजना, अशा अनेक योजना राबविण्यात येत आहेत. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतीमाल विक्री केंद्रामुळे येथील स्थानिक शेतीमालाला विक्रीची सुविधा, तसेच कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन होण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे.

केंद्राच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान तसेच मूल्यसाखळी विकासाचे प्रशिक्षण देण्यात येऊन शेतकऱ्यांच्या नैसर्गिक व सेंद्रिय उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कोल्ड स्टोरेज, क्लिनिंग, ग्रेडिंग, पॅकेजिंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळून त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढणार आहे. या वेळी सेंद्रिय शेतीमालाची विक्री करणाऱ्या रथाला मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली.

असे आहे केंद्र

वाशीम येथील केंद्रासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ५ कोटी ८४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्याचप्रमाणे, अडीच कोटी रुपये निधीतून शेतकरी प्रशिक्षणगृह निर्माण करण्यात आले. शेतकऱ्यांना कृषी व संलग्न विभागाच्या तंत्रज्ञानविषयक गरजेवर आधारित प्रशिक्षण देणे, नाशिवंत शेतीमालास बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा केंद्राचा उद्देश आहे.

केंद्राची क्षमता प्रीकूलिंग १० टन, कोल्ड स्टोरेज ४० टन, रापनिंग चेंबर १५ टन, ग्रेडिंग अँड पॅकिंग, दोन व्यावसायिक गाळे आहेत. जिल्ह्यात एकूण ९० शेतकरी उत्पादक कंपन्या असून २ हजार २१४ शेतकरी उत्पादक गटांची स्थापना करण्यात आली आहे. त्याद्वारे ३० हजार २१० शेतकऱ्यांना संघटित करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT