Water Crisis  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : मराठवाड्यातील ८७७ प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा ४२ टक्क्यांवर

Water Storage In Marathwada : मराठवाड्यातील मोठ्या, मध्यम, लघू प्रकल्पांसह गोदावरी, तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील बंधारे मिळून ८७७ प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा ४२ टक्क्यांवर आला आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील मोठ्या, मध्यम, लघू प्रकल्पांसह गोदावरी, तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील बंधारे मिळून ८७७ प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा ४२ टक्क्यांवर आला आहे. जवळपास ५३ लघू मध्यम प्रकल्प कोरडे पडले असून, ४ मोठ्या प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा २१ टक्क्यांच्या आत आहे. दुसरीकडे जायकवाडी या सर्वांत मोठ्या प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ४४ टक्क्यांवर आला आहे.

पावसाळ्यातील पावसाचे अल्प प्रमाण पाणीसाठ्यांच्या मुळावर उठले आहे. खरीप हंगामातील पीक पैसेवारीने मराठवाड्यात दुष्काळ अधोरेखित केला असताना पाणीसाठ्यांमधील घटते पाणी चिंता वाढविते आहे. मराठवाड्यातील मोठ्या ११ प्रकल्पांपैकी ४ प्रकल्पांत २१ टक्क्यांच्या आत उपयुक्त पाणी शिल्लक आहे. दुसरीकडे या सर्व ११ प्रकल्पांत मिळून ४९ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

गतवर्षीच्या उपलब्ध पाणीसाठ्याच्या तुलनेत यंदाचा मोठ्या प्रकल्पांमधील पाणीसाठा जवळपास निम्मच आहे. जायकवाडीसारख्या मोठ्या प्रकल्पात केवळ ४४ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे.

इतर मोठ्या प्रकल्पांपैकी नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी प्रकल्प तुडुंब आहे. हा प्रकल्प वगळता सिद्धेश्‍वर प्रकल्पात ९२ टक्के, ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्पात ७९ टक्के, निम्नमनार प्रकल्पात ६१ टक्के, येलदरीमध्ये ५९ टक्के, निम्न दुधना व मांजरा प्रत्येकी २१ टक्के, निम्न तेरणा १४ टक्के, माजलगाव १० टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे.

मध्यम प्रकल्पात सर्वात कमी उपयुक्त पाणी

मराठवाड्यातील ७५ माध्यम प्रकल्पात सरासरी सर्वांत कमी म्हणजे केवळ २५.१५ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यापैकी धाराशिवमधील १७ मध्यम प्रकल्पात सर्वात कमी केवळ ११ टक्के जालन्यातील सात प्रकल्पात १३ टक्के परभणीमधील दोन प्रकल्पांत १८ टक्के, लातूरमधील आठ प्रकल्पांत २० टक्के, छत्रपती संभाजीनगरमधील सोळा प्रकल्पांत २२ टक्के, बीडमधील सोळा प्रकल्पांत ३६ टक्के, तर नांदेडमधील नऊ प्रकल्पांत बावन टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

लघू प्रकल्पांची स्थितीही नसे बरी

मराठवाड्यातील ७५० लघू प्रकल्पांत केवळ २६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामध्ये जालन्यातील ५७ लघू प्रकल्पांत सर्वांत कमी ४ टक्के, परभणीतील २२ प्रकल्पांत १२ टक्के, धाराशिवमधील २०६ प्रकल्पांत १५ टक्के, बीडमधील १२६ व लातूरमधील १३४ प्रकल्पांत प्रत्येकी २२ टक्के, छत्रपती संभाजीनगरमधील ९८ प्रकल्पांत २५ टक्के, हिंगोलीमधील २७ प्रकल्पांत ७१ टक्के, तर नांदेड जिल्ह्यातील ८० प्रकल्पांत सर्वाधिक ७९ टक्के उपलब्ध असलेल्या उपयुक्त पाणीसाठ्याचा समावेश आहे.

कोरड्या पडणाऱ्या प्रकल्पांचीही वाढते आहे संख्या

मराठवाड्यातील मध्यम २ व लघू ५१ प्रकल्प आताच्या घडीला कोरडे पडले आहेत. तब्बल २७६ लघू प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला असून, २२ मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठाही जोत्याखालीच आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT