Ratnagiri News: पदक मिळवण्यासाठी कठोर कष्ट आणि प्रामाणिकपणे परिश्रमाची गरज आहे. आपण घेतलेल्या पदवीचा उपयोग निव्वळ आपल्यासाठी नसून शेतकऱ्यांसाठी होणे गरजेचे आहे. त्यांच्या समस्या सोडवून त्यांना व्यावहारिकदृष्ट्या पटवून दिले पाहिजे आणि समस्यांवर अचूक उपाय सांगण्याचे कौशल्य आपल्याकडे असले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.
तसेच कृषी विद्यापीठातील संशोधनामुळे कोकण प्रदेश आणि त्यापलीकडे मोठे बदल घडले आहेत, असे सांगत कौतुकास्पद उद्गार त्यांनी काढले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ४३ व्या दीक्षान्त सोहळ्यात बुधवारी (ता. १४) ते बोलत होते. ते म्हणाले, की सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांनी इथेच न थांबता पुढील आयुष्यात महान गोष्टी साध्य करण्यासाठी पुढे जाणे गरजेचे आहे. या विद्यापीठात घालवलेल्या वेळेने तुम्हाला केवळ शैक्षणिक ज्ञान आणि व्यावहारिक कौशल्यांनीच सुसज्ज केले नाही तर समस्या सोडवण्याची कौशल्ये देखील दिली आहेत.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून यांना कृषी क्षेत्रातील विकसित होत असलेल्या आव्हानांना तोंड देण्याची क्षमता सातत्याने दाखवून देण्यात आली आहे. भारताच्या कृषी संशोधन क्षेत्रात हे विद्यापीठ एक प्रमुख स्थान व्यापत असल्याचे पाहून मला आनंद होत आहे. कृषी, फलोत्पादन, मत्स्यव्यवसाय, कृषी अभियांत्रिकी, वनीकरण किंवा कापणीनंतरच्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील विद्यापीठे, महाविद्यालये आणि संशोधन केंद्रे बहुआयामी संशोधनात गुंतलेली आहेत. जगाची हीच गरज आहे.
आंबा, काजूवर विद्यापीठाचे यशस्वी प्रयोग
कोकणातील आंब्यांची विपुलता जगभरात प्रसिद्ध असून विद्यापीठातील कलम आणि उत्पादन तंत्रांनी आपल्या प्रदेशात आंब्याची लागवड वाढविण्यात योगदान दिले आहे. विद्यापीठाने विकसित केलेल्या उच्च उत्पन्न देणाऱ्या काजूच्या जातींचा अवलंब केला जात आहे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारत आहे.
व्हिएतनाममध्येही या तंत्रज्ञाना वापर केल्याने तेथील शेतकऱ्यांचा देखील फायदा होतो आहे. पशुधन विकासात विद्यापीठाच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळेल. कोकण कन्याळ शेळीची जात आणि कोकण कपिला गाय, भारतात नोंदणीकृत ४३ वी स्थानिक जात, ही सांस्कृतिक परंपरा आणि पर्यावरणीय शाश्वततेवर आधारित संशोधनाची उदाहरणे आहेत, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.