Paddy Threshing  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Threshing : भातझोडणीला ताडपत्रीचा आधार

Paddy Harvesting : सतत पावसाची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. या भीतीपोटीच शेतखळे तयार न करता ताडपत्रीचा आधार घेत शेतकरी शेतातच झोडणी करीत असल्याचे दिसून येत आहे.

Team Agrowon

Wada News : तालुक्यात यंदा पावसाने मोठ्या प्रमाणात भातपिकाचे नुकसान केले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. पावसाच्या भीतीमुळे शेतकऱ्यांनी लगबगीने कापणी करीत एका बाजूला घाईघाईने झोडणीलाही सुरुवात केली आहे.

ताडपत्रीचा आधार घेत अनेक शेतकरी भातझोडणी करीत आहेत. सतत पावसाची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. या भीतीपोटीच शेतखळे तयार न करता ताडपत्रीचा आधार घेत शेतकरी शेतातच झोडणी करीत असल्याचे दिसून येत आहे.

यंदा परतीच्या पावसामुळे उभे भातपीक शेतातच आडवे पडून फार दिवस पाण्यात राहिले. त्यामुळे भातपिकात पळींज जास्त प्रमाणात असून शेतकऱ्यांचे यात मोठे नुकसान झाले आहे.

पावसाचा काही नेम नसल्याने तो कधी पडू शकतो, या भीतीच्या सावटाखाली शेतकरी कायम आहे. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी घाईघाईने मिळेल, त्या वेळेत शेतातच ताडपत्रीच्या सहाय्याने झोडणी करीत असल्याचे दिसत आहे. झोडणीच्या काही नैसर्गिक नियमांना बगल देत शेतकऱ्यांनी झोडणी सुरू केली आहे.

शेतावर शेतखळे तयार करण्यासाठी मेहनत व वेळ जास्त लागत असल्याने शेतखळ्याऐवजी ताडपत्रीचा आम्ही वापर करत झोडणी करून दाणा (भात) सुरक्षित घरात घेत आहोत. यंदा पावसाचा काही नेम राहिला नसून अवेळी पावसाची भीती सतत वाटत आहे.
- सुधीर कडव, शेतकरी, सापने

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT