Paddy Threshing  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Threshing : झोडणीसाठी आधुनिक साधनांचा वापर

Paddy Harvesting : डहाणू आणि तलासरी तालुक्यात सध्या भातझोडणीचे काम जोरात सुरू आहे. यात पारंपरिक पद्धती विसरून शेतकरी आता आधुनिक साधनांचा वापर करू लागला आहे.

Team Agrowon

Palghar News : डहाणू आणि तलासरी तालुक्यात सध्या भातझोडणीचे काम जोरात सुरू आहे. यात पारंपरिक पद्धती विसरून शेतकरी आता आधुनिक साधनांचा वापर करू लागला आहे.

यावर्षी अवकाळी पावसामुळे भात खराब झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला. मात्र, त्यातूनही त्यांनी आपले उत्पादन वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला असून भातझोडणीचे विविध उपाय अवलंब करत आहेत.

पूर्वी भातझोडणी करताना भाताचा भारा बांधून लाकडावर आपटला जायचा आणि बैलजोडी गोल फिरवून मळणी केली जायची. मात्र, आजकाल अनेक शेतकरी बैलजोड्यांचा वापर टाळून ट्रॅक्टर आणि पंख्याच्या साह्याने आधुनिक यंत्रांचा उपयोग करत आहेत.

या पद्धतीत भात आणि तूस वेगळे करण्यासाठी हवेचा प्रभावी वापर केला जातो. सध्या ट्रॅक्टरला पंखा जोडून भात आणि तूस वेगळे करण्याचे जुगाड शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय झाले आहे.

यावर्षी आलेल्या अवकाळी पावसामुळे भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके आणि तयार भात खराब झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या पद्धतीत बदल करून उत्पादन वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT