Ethanol Production  Agrowon
ॲग्रो विशेष

Ethanol Production : इथेनॉल मिश्रणाला बळ देण्याची अमेरिकेची तयारी

Ethanol Update : इथेनॉल निर्मितीसाठी भारताने मक्याची आयात अमेरिकेतून करावी, असा प्रस्ताव या शिष्टमंडळाने दिला आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : भारताच्या इथेनॉल मिश्रणाच्या कार्यक्रमाला बळ देण्याची तयारी अमेरिकेने दाखवली आहे. अमेरिकेच्या शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्याशी बोलताना अमेरिका भारताच्या इथेनॉल कार्यक्रमाला पाठिंबा देण्यासाठी तयार असल्याचे सांगितले.

इथेनॉल निर्मितीसाठी भारताने मक्याची आयात अमेरिकेतून करावी, असा प्रस्ताव या शिष्टमंडळाने दिला आहे. भारताच्या इथेनॉलबाबत धोरणाला पाठिंबा देण्याची ही चांगली संधी असल्याची अमेरिकेच्या शिष्टमंडळाने सांगितले.

भारताने २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य ठेवले आहे. सध्या १२ टक्क्यां‍पर्यंत इथेनॉल मिश्रणाचे लक्ष साध्य झाले आहे. नैसर्गिक वातावरणामुळे साखर उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाल्याने

केंद्राने साखर उद्योगापासून इथेनॉल निर्मितीवर बंधने आणली. यामुळे यंदाच्या हंगामावर त्याचे सावट राहिले. अपेक्षित इथेनॉल निर्मिती होऊ शकली नाही. इतर अन्नधान्यापासूनही समाधानकारक इथेनॉलचा पुरवठा तेल कंपन्यांना झाला नाही. केंद्र सरकार या पार्श्वभूमीवर इथेनॉल निर्मिती वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. धान्यापासून इथेनॉल निर्मिती वाढवण्यासाठी केंद्र सरकार मक्यासारख्या पीक वाढीला प्रोत्साहन देत आहे.

भारताच्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अमेरिकेला ही संधी निर्माण झाली आहे. हे मिश्रण करण्यासाठी भारताला गरजे इतक्या मक्याची आयात अमेरिका करू शकते. याबरोबर इथेनॉल ही पुरवू शकते. यामुळे पुरेशा प्रमाणात इथेनॉल उपलब्ध होऊन भारताच्या या कार्यक्रमाला बळ मिळेल असेही अमेरिकेच्या कृषी विभागाच्या शिष्टमंडळाने या वेळी मत व्यक्त केले.

अमेरिकेने हा प्रस्ताव दिला असला तरी तो अद्याप स्वीकारायचा की नाकारायचा याबाबत केंद्राने कोणतेही स्पष्ट आश्वासन दिले नसल्याचे केंद्रीय सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: गव्हाचे दर टिकून; हळदीत चढउतार, केळीला श्रावणाचा उठाव, आले दरात सुधारणा, मका स्थिरावलेला

Onion Seedling Shortage : कांदा रोपवाटिकांत रोपांची तूट

Women Farmer : महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या शेतमालाची निर्यात प्रेरणादायी

Dam Water Storage : काटेपूर्णा, वाण, खडकपूर्णा, पेनटाकळी प्रकल्पांतील साठ्यात वाढ

Monsoon Rain: विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात पावसाचा जोर कमीच राहणार

SCROLL FOR NEXT