Gokul Milk Sangh agrowon
ॲग्रो विशेष

Gokul Milk Sangh : अमेरिकेतील संस्थांची गोकुळला मदत, म्हशींचे दूध वाढविण्यासाठी २०० गावांना होणार फायदा

Gokul milk : प्रकल्पामध्ये प्राथमिक स्तरावर जिल्ह्यातील किमान २०० गावांतील १५०० म्हशींचा समावेश केला जाईल.

sandeep Shirguppe

Kolhapur Gokul Dudh : कोल्हापूर जिल्ह्यातील म्हशींचे दूध वाढविण्यासह प्रजनन वाढवणे, वैरण बँक तयार करण्यासह अन्य सुविधांसाठी थेट अमेरिकेतील संस्थेच्या सहकार्यातून दोन प्रकल्प उभारले जाणार आहेत. यातून जिल्ह्यातील किमान २०० गावांतील १५०० म्हशींना फायदा होणार आहे. या प्रकल्पामध्ये दूध उत्पादकांनी हिरीरीने सहभागी होऊन म्हैस दूधपालन व्यवसाय निर्माण करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केले.

कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) व भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फौंडेशन (बायफ), उरळीकांचन यांच्या वतीने म्हैशींचे दूध वाढविण्यासाठी त्यांच्या पालन पोषणासंदर्भात प्रयत्न केले जात आहेत.

यामध्ये दुग्ध व्यवसायातील आव्हाने, म्हैस दूध उत्पादन वाढीसाठी व जनावरांचे प्रजनन, आरोग्य सुधारण्यासाठी संतुलित आहाराची उपलब्धता सुनिश्चित करण्यावर भर असेल.

वैरण बँकेचे बळकटीकरण करणे व याद्वारे लहान दुग्ध व्यवसाय शाश्वत करून उत्पादकता वाढवणे या उद्देशाने जिल्ह्यामध्ये दोन प्रकल्प राबवले जातील. प्रकल्पामध्ये प्राथमिक स्तरावर जिल्ह्यातील किमान २०० गावांतील १५०० म्हशींचा समावेश केला जाईल.

प्रकल्पासाठी इन्व्हान्मेंटल डिफेन्स फंड अमेरिका यांच्याकडून १ कोटी ४६ लाखांचे अनुदान मिळेल. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (एनडीडीबी), आनंद व नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट (एनडीआरआय) कर्नाळ (हरियाना) यांचे तांत्रिक सहाय्य व मार्गदर्शन मिळणार असल्याचेही अध्यक्ष डोंगळे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

Cotton Market Price: कापूस दबावातच; तसेच काय आहेत सोयाबीन, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि खरबुजाचे आजचे बाजारभाव

Crop Damage Survey: आंबा, काजू नुकसानीचे सर्व्हेक्षण सुरू

SCROLL FOR NEXT