Gokul Dudh Sangh
Gokul Dudh Sanghagrowon

Gokul Dudh Sangh : 'गोकुळ'कडून दूधवाढीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन,१५ म्हशी आणि १५ गायींचे वाटप

15 Buffaloes and 15 Cows : मुऱ्हा जातीच्या १५ म्हशी करनाल हरियाणा येथून तर जर्सी जातीच्या - १५ गायी बंगळूर कोलारमधून खरेदी केल्या.
Published on

Kolhapur District Milk Sangh : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्यातर्फे दूधवाढ कृती कार्यक्रम राबवला जात आहे. म्हैस दूधवाढ कृती कार्यक्रमांतर्गत श्री राधाकृष्ण सहकारी दूध संस्था कुशिरे (ता. पन्हाळा) संस्थेच्या दूध उत्पादकांनी एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून मुऱ्हा जातीच्या १५ म्हशी करनाल हरियाणा येथून तर जर्सी जातीच्या - १५ गायी बंगळूर कोलारमधून खरेदी केल्या. त्याचे कुशिरेत गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्याहस्ते वाटप झाले.

अरुण डोंगळे म्हणाले, 'गोकुळने २० लाख लिटरचे दूध संकलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. संघाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन दूध वाढीसाठी प्रयत्नशील राहावे.' यावेळी गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले व अमरसिंह पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

दूध उत्पादक राजाराम कळके यांनी दूध संस्थेला जास्त दूध पुरवठा केल्याबदल व एच.डी.एफ.सी. बँकेचे प्रतिनिधी संतोष नाळे त्यांचा सत्कार मान्यवरांचा हस्ते करण्यात आला.

Gokul Dudh Sangh
Gokul Milk : गोकुळच्या दूध विक्रीचा नवा उच्चांक ! दिवसभरात २२ लाख ३१ हजार लिटर दूध विक्री

संचालक अमरसिंह पाटील, सहायक व्यवस्थापक संकलन बी. आर. पाटील, अधिकारी डॉ. कडवेकर, धनंजय यादव, संजय पाटील, प्रकाश माने, डॉ. ईश्वर काटकर, माजी सरपंच विष्णू पाटील, राधाकृष्ण दूध संस्थेचे सुरेश कळके, पांडुरंग पाटील.

विष्णू खांडेकर, लक्ष्मण कळके, धनाजी चोपदार, संदीप गुरव, महादेव माने, भिकाजी कांबळे, ग्रामपंचायत सदस्य, दूध संस्थांचे पदाधिकारी व दूध उत्पादक सभासद उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com