Rain Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : लातूरमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

Latur Rain News : जोरदार वाऱ्यामुळे अनेक भागात शेतशिवारातील पिके आडवी झाली, तर शेतातील कडबाही भिजला. शेतकऱ्यांनी कडबा तसेच काढणी केलेले पीक झाकण्यासाठी तारांबळ उडाली होती. काही भागात वाऱ्याचा कैऱ्यांनाही तडाखा बसला आहे.

Team Agrowon

Latur News : जिल्ह्यात ठिकठिकाणी गुरुवारी (ता. २०) ढगाळ वातावरण होते. त्यातच सायंकाळी वादळीवाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. काही भागात शिडकावा झाला. जोरदार वाऱ्यामुळे अनेक भागात शेतशिवारातील पिके आडवी झाली, तर शेतातील कडबाही भिजला. शेतकऱ्यांनी कडबा तसेच काढणी केलेले पीक झाकण्यासाठी तारांबळ उडाली होती. काही भागात वाऱ्याचा कैऱ्यांनाही तडाखा बसला आहे.

उकाड्याने त्रस्त औसेकरांना दिलासा

औसाशहरात एकीकडे तापमानात वाढ झाल्याने नागरिक उकाड्यामुळे कमालीचे त्रस्त झाले होते. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी अवकाळी पावसाची हजेरी लागल्याने उकाड्याने त्रस्त औसेकरांना दिलासा मिळाला. अचानक आलेल्या या पावसामुळे दुचाकीस्वारांची तारांबळ उडाली होती.

येरोळ परिसरात वाऱ्यासह पाऊस

येरोळ शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ परिसरात गुरुवारी सायंकाळी साडेपाचला अचानक आलेल्या वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतशिवारातील काढणी केलेली पिके, उघड्या बनमी झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली. वेगाच्या वादळी वाऱ्यामुळे शिवारातील ज्वारी, करडई, गहू अशी पिके आडवी पडली.

वाऱ्यामुळे शिवारातील आंब्यालाही फटका बसला, अनेक झाडांखाली कैऱ्यांचाही सडा पडला होता. तब्बल पाच मिनिटे वेगवान वारे व पंधरा मिनिटे पडलेल्या पावसामुळे शेतशिवारातील काढून ठेवलेल्या पिकांच्या बनमी उडाल्या, भिजल्या. पिके आडवी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. याबाबत पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांतून मागणी केली जात आहे.

जळकोट तालुक्यात पाऊस

दिवसभर उन्हाचा तडाखा बसत असताना गुरुवारी सायंकाळी वातावरणात बदल झाला. त्यात ढगही दाटून आले. काही भागात सायंकाळी सहा वाजता पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही वेळ वातावरणात गारवा पसरला होता. जळकोट तालुक्यातील वांजरवाडा, होकर्णा परिसरातील काही गावांत सायंकाळी सहा वाजता पावसाचा शिडकावा झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agristack Registration: छत्रपती संभाजीनगरमध्ये सव्वा लाखाहून अधिक शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी प्रलंबित

Book Review: प्रादेशिक सिनेमांचा आस्वादक धांडोळा

Shades of History: इतिहासातील करडी छटा

Interview with Ashish Thackeray: बिगरजंगली बिबट्यांमुळेच संघर्ष वाढतोय

Ashtamudi Lake: एका कवितेची सत्तरी

SCROLL FOR NEXT