Crop Damage Compensation : ई-केवायसी नसल्याने २२ कोटींचा निधी पडून

Heavy Rain Crop Loss : खरीप हंगाम २०२४ मध्ये जून ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडून ४६६ कोटी ४० लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.
Crop Damage Compensation
Crop Damage CompensationAgrowon
Published on
Updated on

Latur News : खरीप हंगाम २०२४ मध्ये जून ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडून ४६६ कोटी ४० लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीवाटपाची कार्यवाही डीबीटी प्रणालीमार्फत सरू आहे.

आजपर्यंत जिल्ह्यातील तीन लाख ८६ हजार ५०५ लाभार्थी मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले असून, त्यापैकी तीन लाख ५० हजार ३७३ लाभार्थींना ३८७ कोटी ३४ लाख रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. तसेच २४ हजार ३८२ शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी न केल्याने २१ कोटी ७७ लाख रुपये इतका निधी वितरित करणे शिल्लक आहे. दरम्यान, संबंधित शेतकऱ्यांनी ता. २५ मार्चपर्यंत ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Crop Damage Compensation
Crop Damage Compensation : नंदुरबारातील नुकसानग्रस्तांना मदतनिधी केव्हा मिळेल?

लातूर जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांमार्फत ई-केवायसी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांची गावनिहाय यादी संबंधित गावांच्या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे; तसेच याबाबत दवंडी व प्रसिद्धीमाध्यमांत प्रसिद्धी देऊन शेतकऱ्यांना ई-केवायसी पूर्ण करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.

Crop Damage Compensation
Crop Damage Compensation : अतिवृष्टिबाधित शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा ; शासनाकडून १९३ कोटींचा निधी उपलब्ध; यंत्रणांकडून कासवगतीने कार्यवाही

तरी ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही, अशा शेतकऱ्यांनी संबंधित तहसील कार्यालय किंवा ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे संपर्क साधून व्हीके नंबर प्राप्त करून घेऊन नजीकचे आपले सरकार सेवा केंद्र किंवा नागरी सुविधा केंद्र (सीएससी) येथे जाऊन ई-केवायसी ता. २५ मार्च २०२५ पूर्वी पूर्ण करून घ्यावी.

संबंधित शेतकरी यांनी ई-केवायसी पूर्ण केल्यानंतरच शासनाकडून डीबीटीपर्यंत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात मदतीची रक्कम जमा होणार आहे. तरी मदतीसाठी पात्र आहेत व अद्यापपर्यंत ई-केवायसी केलेली नाही, अशा शेतकऱ्यांनी मुदतीत ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com