Unseasonal Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : अवकाळी पावसाचा कोरडवाहू भागाला फटका

Crop Damage : गेल्या दोन दिवसांपूर्वी नगर तालुक्यातील काही गावांना अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला.

Team Agrowon

Nagar News : ः गेल्या दोन दिवसांपूर्वी नगर तालुक्यातील काही गावांना अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला. या अवकाळी पावसाने हुरड्यात आलेल्या कोरडवाहू जमिनीतील ज्वारी भुईसपाट झाल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपुढे पुन्हा जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या कोरडवाहू शेतकऱ्यांना राज्य शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संदेश कार्ले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

नगर तालुक्यातील ५२ हजार ९२७ हेक्टर क्षेत्रापैकी या वेळी ४१ हजार ७२९ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणी झाली. यावर्षी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी ज्वारी आणि हरभरा या पिकांच्या पेरणीला प्राधान्य दिले.

नगर तालुक्यात १६ हजार ४६७ हेक्टर ज्वारी, ४ हजार ६९ हजार हेक्टर हरभरा, १ हजार ४६९ हजार हेक्टर गहू तर २ हजार ९८९ हेक्टर क्षेत्रात फळबाग अशी प्रमुख पिके आहेत.

शुक्रवारी (ता. ५) सांयकाळी चिचोंडी पाटील, खारे कार्जुने, टाकळी काझी, टाकळी खातगाव, निंबळक, नेप्ती, खडकी,खंडाळा, वाळकी, देऊळगाव सिद्धी, रुईछत्तीशी, सारोळा कासार, अकोळनेर या भागांत जोरदार अवकाळी पाऊस झाला, असे संदेश कार्ले म्हणाले.

गेल्या वर्षीची मदतही नाही

तालुक्यात गेल्या वर्षी निसर्गाच्या अवकृपेमुळे बाधित झालेल्या पिकांसाठी अजून मदत मिळालेली नाही. त्यात हे यावर्षीचे संकट, अवकाळी पावसाच्या फटक्याने ज्वारी, हरभरा, गहू पिकांना फटका बसला आहे. यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे सावट आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT