Unseasonal Rain : मॉन्सूनोत्तर पावसामुळे अकोल्यात २०८ कोटींचे नुकसान

Unseasonal Rain Crop Damage : अकोला जिल्ह्यात २६ ते २९ नोव्हेंबरदरम्यान मॉन्सूनोत्तर पाऊस झाला होता. यामध्ये एक लाख ८८ हजार ४२४.८८ हेक्टरवरील शेतीपिकाचे नुकसान झाले होते
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Akola News : अकोला जिल्ह्यात २६ ते २९ नोव्हेंबरदरम्यान मॉन्सूनोत्तर पाऊस झाला होता. यामध्ये एक लाख ८८ हजार ४२४.८८ हेक्टरवरील शेतीपिकाचे नुकसान झाले होते. दोन लाख ४४ हजार ६९ शेतकऱ्यांना या नुकसानीचा फटका बसला. नुकसानग्रस्तांना मदतीसाठी २०७ कोटी ९२ लाख ६४ हजार ८१० रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.

जिल्ह्यात २६ नोव्हेंबरच्या रात्रीपासून सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली होती. या पावसामुळे कापूस पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले. वेचणीला आलेला हजारो एकरातील कापूस भिजला. हा भिजलेला कापूस पिवळा पडला.

Crop Damage
Unseasonal Rain : नगर जिल्ह्यातील पन्नास महसूल मंडलांत जोरदार पाऊस

२६ नोव्हेंबरच्या रात्रीपासून २७ नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत जिल्ह्यात तेंव्हा ३२.६ मिमी तर २७ नोव्हेंबरच्या रात्रीपासून २८ नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत २१.१ मिमी पावसाची नोंद झाली होती. हा पाऊस येण्यापूर्वी शेतीशिवारे कापसाने पांढरी झाली होती. मजुरांअभावी कापसाची वेचणी तेव्हा होऊ न शकल्याने हा कापूस पावसाच्या तडाख्यात सापडला.

तुरीच्या पिकाचेही नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त क्षेत्राचा संयुक्त पंचनामा पूर्ण झाला असून याचा एकत्रित अहवाल तयार करण्यात आला. त्यानुसार नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी २०७ कोटी ९२ लाख ६४ हजार ८१० रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.

असे आहे नुकसान

पावसामुळे फळपिके सोडून एक लाख ३६ हजार ५२६.६६ हेक्टरवरील जिरायती क्षेत्र बाधित झाले. त्याचा एक लाख ६८ हजार ३५ शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला. ७२९ गावांतील शेतकऱ्यांचे हे नुकसान होते. मदतीसाठी ११६ कोटी ४७ लाख ६ हजार ६१० रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे.

फळपिके सोडून ४५ हजार २५८.५ हेक्टरवरील बागायती पिकांचेही नुकसान झाले. त्यासाठी ७६ कोटी ९३ लाख ९४ हजार ५०० रुपये हवेत. ७४९ गावांतील ६६ हजार ३६१ शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला.

Crop Damage
Unseasonal Rain Crop Damage : खानदेशात पावसाने कापूस, तूर, फळबागांची मोठी हानी

६ हजार ६३९.७२ हेक्टरवरील फळ पिकाखालील क्षेत्र बाधित झाले. त्याचा ९ हजार ६७३ शेतकऱ्यांना फटका बसला असून २६३ गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या मदतीसाठी शासनाकडे १४ कोटी ९३ लाख ९३ हजार ७०० रुपयांची मदत मागण्यात आली आहे.

या पिकांचे झाले नुकसान

कापूस, तूर, ज्वारी, हरभरा, गहू, भाजीपाला, कांदा, केळी, पपई, लिंबू, आंबा, मोसंबी, पेरू, संत्रा,

नुकसानाची आकडेवारी

बाधित शेतकरी संख्या ः २ लाख ४४ हजार ६९

बाधित क्षेत्र ः एक लाख ८८ हजार ४२४.८८

अपेक्षित मदत ः २०७ कोटी ९२ लाख ६४ हजार ८१० रुपये

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com