Unseasonal Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : खानदेशात पावसाने नुकसान सुरूच

Heavy Rain Crop Damage : खानदेशात रोज पाऊस व वादळ अशी समस्या येत आहे. उन्हाळ हंगामातील पिकांची काढणी, मळणी सुरू असतानाच पावसाचा धुमाकूळ मागील १० ते १२ दिवस विविध भागात सुरू आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात रोज पाऊस व वादळ अशी समस्या येत आहे. उन्हाळ हंगामातील पिकांची काढणी, मळणी सुरू असतानाच पावसाचा धुमाकूळ मागील १० ते १२ दिवस विविध भागात सुरू आहे. यामुळे बाजरी, तीळ, कांदा, केळी, पपई आदी पिकांची हानी होत असून, शेतातील चाऱ्याचीही नासाडी होत आहे.

अनेक शेतकऱ्यांचे क्षेत्र पेरणीसाठी तयार नाही. काही शेतकऱ्यांचा उशिरा लागवडीचा मका शेतात कापून पडला आहे. त्यात मळणी झालेली नाही. अशात रोज पाऊस येत असल्याने अडचणी येत आहेत. शेतकऱ्यांना शेतातील मका, बाजरीची कणसे ताडपत्रीने झाकून ठेवावी लागत आहेत.

कांद्याची काढणीदेखील जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, जळगाव भागात सुरू आहे. या काढणीसही पावसाचा फटका बसत आहे. काढणीनंतर कांदा लागलीच झाकून ठेवावा लागत आहे. कांदा उपटून तो दोन ते चार दिवस पातीसह वाळविण्याची फुरसतही मिळत नसल्याने उपटल्यानंतर लागलीच त्याची खांडणी किंवा खुडणी करून तो ताडपत्रीखाली झाकला जात आहे. यामुळे त्याच्या दर्जावरही परिणाम होत आहे.

खानदेशात या आठवड्यात अनेक भागात रोज पाऊस आला आहे. काही भागात हलका ते मध्यम तर काही भागात जोरदार पाऊस झाला. सुदैवाने गारपीटीची समस्या नव्हती. परंतु पावसापूर्वी वादळ येत असल्याने त्यातही नुकसान होत आहे. शुक्रवारी (ता.१६) खानदेशात एरंडोल, धरणगाव, जळगाव, धुळे, नंदुरबार आदी भागात पाऊस झाला. एरंडोल, जळगाव भागात सायंकाळी सुमारे पाच वाजेच्या सुमारास सुसाट वाऱ्यानंतर २० ते २५ मिनीटे पाऊस झाला.

काही भागात तुरळक पाऊस होता. शुक्रवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी प्रचंड उकाडा व उष्णता अशी स्थिती होती. सायंकाळी पाऊस झाला. यानंतर रात्रीही उकाडा व ढगाळ वातावरण अशी स्थिती होती. वादळी पावसाने जळगावातील जळगाव, रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर, जामनेर, पाचोरा, भडगाव, धरणगाव, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील तळोदा, शहादा, अक्कलकुवा, नंदुरबार आदी भागात केळीला फटका बसला आहे. लहान केळीची पाने फाटून हानी झाली आहे.

पंचनाम्यांबाबत तक्रारी

खानदेशात अनेक भागात या महिन्याच्या सुरवातीला गारपीट व वादळी पाऊस झाला होता. त्यासंबंधी पंचनामे झाले. नंतरही वादळी पाऊस झाला. परंतु नंतरच्या पावसात नुकसान ३० ते ३५ टक्क्यांवर झालेले नसल्याची सबब प्रशासनातील मंडळी पुढे करीत आहे. यामुळे पंचनाम्याचे कामकाज ठप्प आहे. नुकसानच झालेले नाही, असे सांगून पंचनामे केले जात नाहीत, अशा तक्रारी शेतकरी करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT