Pre Monsoon Crop Damage: पावसाने २२ हजार हेक्टरवरील पिके बाधित

Agriculture Loss: मे महिन्यातील पूर्वमोसमी पावसाने राज्यभरातील फळपिके व उन्हाळी पिकांचे २२,२३३ हेक्टर क्षेत्रावर नुकसान केले असून, अमरावती जिल्ह्यात एकट्याच १०,६३६ हेक्टरवर फटका बसला आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Mumbai News: राज्यात मे महिन्यात पडलेल्या पूर्वमोसमी पावसाने राज्यातील २२ हजार २३३ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वाधिक १० हजार ६३६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

कृषी विभागाने १ ते १३ मेअखेर झालेल्या पावसामुळे नुकसानीचा पंचनामा केला असून, आता मदतीसाठी हा प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठविला जाणार आहे. राज्यातील विविध भागांत सध्या जोरदार पूर्वमोसमी पाऊस सुरू आहे. या पावसामुळे फळपिके आणि उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

Crop Damage
Unseasonal Rain : पावसाने शिवारातील वीजपुरवठा होतोय विस्कळीत

असे असले तरी खरिपाच्या तयारीसाठी हा पाऊस उपयुक्त आहे. जिरायती शेती, ऊस पिकासाठी हा पाऊस उपयुक्त मानला जातो. मात्र राज्यात सध्या आंब्याचा हंगाम सुरू आहे. तसेच कांदा, ज्वारी, भात, भुईमूग भाजीपाला, लिंबू, मका, केळी, पपई आदी पिके आणि फळपिके उन्हाळ्यात घेतली जातात. ही पिके काढणीला आली असताना पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. नाशिक, जालना, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, पालघर, धुळे, यवतमाळ, वाशीम, बुलडाणा आदी जिल्ह्यांत मोठे नुकसान झाले आहे.

जिल्हानिहाय नुकसान झालेली पिके, फळपिके, कंसात क्षेत्र (हेक्टरमध्ये)

पालघर : केळी, जांभूळ, आंबा, भात, चिक्कू (७९६ हेक्टर)

रायगड : आंबा (१७)

ठाणे : आंबा (१)

नाशिक : बाजरी, मका, डाळिंब, आंबा, कांदा, भाजीपाला (१७३४)

धुळे : बाजरी, मका, कांदा, पपई, केळी (६४५)

Crop Damage
Crop Damage Assistance: वादळी पावसामुळे २२ हजार हेक्टरवरील पिकांचे १३ दिवसांमध्ये नुकसान

नंदूरबार : बाजरी, कांदा, केळी (२८)

अहिल्यानगर : पाथर्डी, राहुरी, कोपरगाव, राहाता(१४)

पुणे : आंबा (५)

जळगाव : मका, ज्वारी, भाजीपाला, बाजरी, कांदा, केळी, पपई, आंबा (४३९६)

जालना : पपई, केळी, बाजरी, भाजीपाला (१६९५)

परभणी : केळी (४१)

बुलडाणा : मूग, उडीद, मका, पपई, कांदा, भाजीपाला, केळी( १८१)

अमरावती : मूग, कांदे, ज्वारी, केळी, संत्रा आणि इतर (१०६३६)

यवतमाळ : मूग, भुईमूग, केळी,ज्वारी, पपई, भाजीपाला (१७८)

वाशीम : मूग, उडीद, भुईमूग, केळी, आंबा, लिंबू (२०३)

वर्धा : तीळ, भाजीपाला, संत्रा, केळी, पपई (२३)

नागपूर : भात, संत्रा, मोसंबी, भाजीपाला (४२)

चंद्रपूर : भात, संत्रा, मोसंबी, भाजीपाला (१०३८)

भंडारा : भात, फळपिके (७५)

गोंदिया : भात, भाजीपाला, फळपिके (१४३)

गडचिरोली : भात, मका, आंबा व इतर (३४२)

एकूण नुकसान : २२ हजार २३३ हेक्टर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com