Pomegranate Crop Damage: माण तालुक्यात चक्रीवादळाने डाळिंब बागांचे लाखोंचे नुकसान

Storm Impact: माण तालुक्यातील परकंदी गावात गुरुवारी आलेल्या चक्रीवादळ व पावसामुळे डाळिंब बागांचे लाखोंचे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे अतोनात कष्ट वाया गेले असून मदतीसाठी शासनाकडे मागणी वाढली आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Satara News: ढगफुटीसदृश पाऊस व चक्रीवादळाने गुरुवारी (ता. १५) माण तालुक्यातील परकंदी येथील डाळिंब बागांचे लाखोंचे नुकसान झाले. शासनाने मदत करून दिलासा द्यावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

पावसाने गुरुवारी या संपूर्ण परिसराला अक्षरशः झोडपून काढले. या पावसासोबत आलेल्या चक्रीवादळामुळे परिसरातील डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले. बाळू नामदेव इंगळे या शेतकऱ्याने पावणे तीन एकरांवर ९७५ डाळिंब झाडे लावली आहेत. या सर्व झाडांना फळधारणा झाली असून ही झाडे बहरात आली आहेत. त्यातील साधारण फळांनी लगडलेल्या ३५० झाडांचे नुकसान झाले आहे.

Crop Damage
Pre Monsoon Crop Damage: पावसाने २२ हजार हेक्टरवरील पिके बाधित

ही झाडे अक्षरशः भुईसपाट झाली आहेत. काही झाडांची फळझड झाली आहे. तर कुंपणाचे खांब तुटून झाडांवर पडल्याने क्रॉप कव्हर, तसेच कुंपणाचे नेट फाटले आहे. काही झाडांच्या फांद्या पाटल्या आहेत. यांच्यासोबत ज्ञानदेव भागोजी माने (३० गुंठे), संजय हणमंत माने (३० गुंठे), बाळासाहेब कुंडलिक कदम (६० गुंठे), मानसिंग गोजाबा गोळे (४० गुंठे) डाळिंब बागांचे नुकसान झाले आहे.

प्रभारी तहसीलदार अनिकेत पाटील, मलवडी मंडळ अधिकारी राहुल जाधव, आंधळी मंडळ अधिकारी मीनाक्षी दौंड, परकंदीचे तलाठी चंद्रकांत जगदाळे, मलवडीचे तलाठी अमोल कोकणे यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली तसेच पंचनामा केला. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी वैभव लिंगे, मंडळ कृषी अधिकारी रवींद्र मोरे यांनी सुद्धा भेट देऊन पाहणी केली‌.

Crop Damage
Crop Damage : मुसळधारेने ६७४ हेक्टरवर दाणादाण

‘पंचनाम्यावर सही करण्यासाठी कृषी सहायक उपलब्ध नाहीत’

सध्या कृषी सहायकांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. त्यामुळे पंचनामा करण्यासाठी तसेच महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यावर सही करण्यासाठी कृषी सहाय्यक उपलब्ध झाले नाहीत. किमान आपत्कालीन परिस्थितीत तरी आंदोलन बाजूला ठेवले जावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

टॅंकरने बागा वाचवल्या, पण पावसाने घात केला

परकंदी गावाला गेले दोन महिने टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. भीषण दुष्काळाचा सामना करत असताना ऐन उन्हाळ्यात मलवडीतून टॅंकरने विकत पाणी आणून शेतकऱ्यांनी बागा जागविल्या आहेत. फक्त बागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी टँकरसाठी लाखो रुपये खर्च केले आहेत.

‘अतोनात कष्ट करून बागा जागविल्या’

‘‘आमच्या भागातील शेतकरी गेल्या चार-पाच वर्षांपासून डाळिंब लागवडीत उतरले आहेत. अतोनात कष्ट करून डाळिंब बागा जागविल्या आहेत. मात्र, अचानक आलेल्या या संकटाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवले आहे,’’ असे माजी सरपंच व डाळिंब उत्पादक शेतकरी बाळासाहेब कदम यांनी सांगितले

परकंदीतील डाळिंब बागांच्या नुकसानीचा पंचनामा केला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
अनिकेत पाटील, प्रभारी तहसीलदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com