Unseasonal Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : मंगळवेढ्यात अवकाळीने १८ गावांमध्ये नुकसान

Team Agrowon

Mangalvedha News : मंगळवेढा तालुक्यात १० ते १२ एप्रिल दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने शेती पिकांचे व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बाधिताचे पंचनामे करून प्राथमिक अहवाल सादर करण्याच्या सूचना क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी दिली.

तालुक्यात अवकाळी पाऊस, वादळ वारा यामुळे तालुक्यातील जवळपास १८ गावांमध्ये शेती पिकांचे व घरांचे नुकसान झाले. त्यामध्ये वादळी वाऱ्याने एकूण २५ घरांचे पत्रे उडून गेले तर दोन ठिकाणी झाड घरावर पडून भिंतींचे नुकसान झाले. तसेच वीज पडून कर्जाळ व बोराळे येथे प्रत्येकी एक जर्सी गाय, कचरेवाडीत एक म्हैस असे तीन मोठी जनावरे मृत झाली.

तळसंगी, मरवडे, डिकसळ येथे आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. रेवेवाडी व आंधळगाव येथे वादळी वाऱ्यामुळे शेळ्या व पिले मृत झाली आहेत. डीकसळ, रेवेवाडी, भाळवणी, मरवडे, जालिहाळ, बावची, खडकी, कर्जाळ, कात्राळ, तळसंगी, कचरेवाडी, आंधळगाव, कागष्ट, लमाणतांडा, हाजापूर, बोराळे आदी गावांमध्ये नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून गेले.

नुकसानग्रस्त ठिकाणी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांनी भेटी दिल्या असून संबंधित नुकसानीचे पंचनामे करून प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला असून पुढील कार्यवाहीस्तव जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवण्यात येणार असून अजूनही ज्या शेतकऱ्यांचे नुकसान पंचनामा करायचा राहिला असेल त्यांनी आपल्या तलाठी, सर्कल यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन तहसीलदार जाधव यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT