Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Crop Damage : अमरावती विभागात १९ हजार हेक्टरला फटका

Unseasonal Rain Crop Loss : मे महिन्यात झालेल्या पावसाने शेतीपिकांचे झालेल्या नुकसानीचे व घरांच्या पडझडीसह पशू तथा मनुष्य मृत्यूचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

Team Agrowon

Amaravati News : मे महिन्यात झालेल्या पावसाने शेतीपिकांचे झालेल्या नुकसानीचे व घरांच्या पडझडीसह पशू तथा मनुष्य मृत्यूचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. या पावसाने अमरावती विभागातील १९ हजार ७२४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यात नुकसानीचे प्रमाण सर्वाधिक आहे.

कडक उन्हाळा राहणारा मे महिना यंदा पावसानेच व्यापलेला राहिला. या पावसाने कांदा, उन्हाळी ज्वारी, मूग, गहू या पिकांसह संत्रा, केळी व भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. अमरावती विभागातील १९ हजार ७२४ हेक्टर क्षेत्रातील या पिकांना बाधा पोहोचली असून ते नष्ट झाले आहे. उन्हाळ्यात कांद्याला सर्वाधिक मागणी असते. मात्र पावसाने तो ओला होण्यासोबतच खराब झाल्याने वापरायोग्य राहिलेला नाही.

अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात नुकसान झाले असून सर्वाधिक फटका अमरावती जिल्ह्यास बसला आहे. १२ हजार ७६४ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले आहे. तर बुलडाणा जिल्ह्यातील ५ हजार ७३७ हेक्टरला चांगलाच तडाखा बसून पिकांची अपरिमित हानी झाली आहे.

राज्य सरकारने नुकसानीचे पंचनामे करून अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. पिकांसोबत मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड झाली असून लहान व मोठे पशू दगावल्याच्या घटना अधिक आहेत. वीज पडून मनुष्यहानीही झाली आहे.

पंचनामे सुरू

कृषी सहायकांच्या आंदोलनामुळे पंचनामे रखडले होते. तथापि सहायकांनी पंचनाम्यास होकार देत काम करण्याची तयारी दर्शविली होती. दरम्यान मंगळवारी आंदोलनाचा तिढा सुटल्याने पंचनाम्यांच्या कामास गती येणार आहे.

जिल्हानिहाय नुकसान (हेक्टर)

अमरावती १२,५६४

बुलडाणा ५,७३७

यवतमाळ २९०

अकोला ९०९

वाशीम २२४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Youth Scheme: कर्जाचा व्याज परतावा तातडीने द्या : तांबे

Farmer Cup 2026: फार्मर कप स्पर्धेत पुतळीच्या महिला समूहाचा सहभाग

HTBT Cotton Seeds: नागपुरात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Satara Rain News: पूर्वमोसमी पावसाचा साताऱ्याला मोठा फटका

Hingoli Water Scarcity: पाणीटंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरीना मंजुरी

SCROLL FOR NEXT