Soybean Crop Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Crop : सोयाबीनला भाराभर पाला, शेंगा विरळच

Soybean Crop Damage : पेरणीपासून सतत पडलेल्या पावसामुळे सोयाबीन पिकाची अनावश्यक वाढ झाली आहे.

Team Agrowon

Solapur News : पेरणीपासून सतत पडलेल्या पावसामुळे सोयाबीन पिकाची अनावश्यक वाढ झाली आहे. अंतरकांडी वाढल्यामुळे सोयाबीन शेतकऱ्यांच्या कमरेच्या, कोठे छाती एवढ्या उंचीपर्यंत सोयाबीन पोचले आहे. मात्र, या भरमसाट वाढलेल्या सोयाबीनच्या झुडपांना शेंगा मात्र विरळच आहेत.

गेल्या काही वर्षापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात सोयाबीन पिकाचा पेरा वाढला आहे. यावर्षी वेळेवर पाऊस पडल्यामुळे खरिपाच्या क्षेत्रामध्ये मोठी वाढ झाली. यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

मात्र पेरणी हंगामापासून सतत पाऊस पडत असल्यामुळे या पेरणी झालेल्या पिकांना हवेतील नत्राचा मोठ्या प्रमाणात पुरवठा झाला आहे. परिणामी पिकांची अनावश्यक वाढ झाली आहे. अंतर काढण्याची वाढ झाल्यामुळे सोयाबीनची झुडपे शेतकऱ्यांच्या छातीपर्यंत पोचली आहेत.

असे असताना या झुडपांना शेंगा मात्र अत्यल्प प्रमाणात लागल्या आहेत. अनावश्यक वाढ झाली असल्यामुळेच हा परिणाम झाल्याचे जाणकारांनी सांगितले. साहजिकच शेंगा कमी असल्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार आहे.

यावर्षी सतत पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन पिकाची भरमसाट वाढ झाली आहे. मात्र त्या प्रमाणात शेंगा लागल्या नाहीत. यामुळे सध्या शिवारात रुबाबात डोलणारे सोयाबीन उत्पन्नाच्या बाबतीत मात्र निराशा करणारे आहे.
- धनाजी भोसले, शेतकरी, कोंडी, ता. उत्तर सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sustainable Farming : नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक तरतुदींसाठी प्रयत्न करू

Parbhani Water Crisis : परभणी जिल्ह्यातील चार लघू तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली

Daryapur Drought : दर्यापुरात कोरडा दुष्काळ जाहीर करा

Crop Insurance : जूनमधील पीक नुकसानीसाठी साडेआठ लाख मंजूर

Smart Village : तंत्रज्ञानाचा अवलंब करून गाव समृद्ध करा : डॉ. ससाणे

SCROLL FOR NEXT