Environmental Benefits Agrowon
ॲग्रो विशेष

Vermicompost Sales : गांडूळ खत विक्रीतून विद्यापीठाला उत्पन्न

Organic Farming : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी विविध विभागांच्या सुधारणांवर भर दिला आहे. याचाच एक भाग म्हणजे विद्यापीठाच्या पशुसंवर्धन व दुग्ध शास्त्र विभागाने गांडूळ खत निर्मिती आणि विक्रीला सुरुवात केली आहे.

 गोपाल हागे

Akola News : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी विविध विभागांच्या सुधारणांवर भर दिला आहे. याचाच एक भाग म्हणजे विद्यापीठाच्या पशुसंवर्धन व दुग्ध शास्त्र विभागाने गांडूळ खत निर्मिती आणि विक्रीला सुरुवात केली आहे. यंदाच्या वर्षात या विभागाने २० टन गांडूळ खताची विक्री केली. यातील पाच टन गांडूळ खत हे दुबई येथे निर्यात झाली.

प्रकल्पास प्रारंभ

कृषी विद्यापीठाने कृषी (पदवी, पदव्युत्तर, आचार्य) अभ्यासक्रमांतर्गत पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विषयामध्ये शैक्षणिक, संशोधन व विस्तारविषयक कार्याला गती दिली आहे. विभागाच्या प्रक्षेत्रावर देशी गोवंश आणि संकरित जातीची २३० जनावरे आहेत.

या ठिकाणी जनावरांपासून मिळणारे दूध संशोधन कार्यासाठी वापरून उर्वरित दुधाची विक्री केली जाते. विभागाच्या उत्पन्न वाढीसाठी कुलगुरू डॉ. गडाख यांनी गांडूळ खत आणि व्हर्मिवॉश निर्मितीवर भर देण्याविषयी मार्गदर्शन केले तसेच आर्थिक निधी उपलब्ध करून दिला. यातून गेल्या वर्षी गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरू झाला.

शेतकऱ्यांपर्यंत प्रसार

खत निर्मितीसाठी वि‌द्यापीठ परिसरातील झाडांचा पालापाचोळा, वाया जाणारा चारा तसेच अर्धवट कुजलेल्या शेणाचा वापर केला जातो. विभागातील विद्यार्थी गांडूळ खत निर्मितीबाबत विविध प्रयोग करत आहेत. विभाग प्रमुख डॉ. शेषराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक प्राध्यापक डॉ. संजय शेगोकार, कृषी सहायक प्रदीप बोळे हे प्रकल्पाचे व्यवस्थापन सांभाळतात. या प्रकल्पासाठी डॉ. राजेश्‍वर शेळके, डॉ. संजीव नागे,

डॉ. किशोर बिडवे, रवी पवार, राजेश ढगे यांचे सहकार्य मिळाले आहे. या वर्षभरात विद्यापीठाने वीस टन गांडूळ खत आणि एक हजार लिटरपेक्षा अधिक व्हर्मिवॉशची शेतकऱ्यांना विक्री केली. तसेच पाच टन गांडूळ खत दुबईला निर्यात करण्यात आले. विभागाला गांडूळ खत विक्रीतून तीन लाख रुपये आणि गांडूळ बीज विक्रीतून बारा हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. या प्रकल्पाला आतापर्यंत सुमारे ३५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी भेट दिली आहे.

डॉ. शेगोकार : ९४२२९३९०३७

...असा आहे प्रकल्प

गांडूळ खत निर्मितीसाठी तीन युनिट. एका युनिटमध्ये एक टन क्षमतेचे ३० प्लॅस्टिक बेड, उर्वरित दोन युनिटमध्ये जमिनीवर ढीग पद्धतीने गांडूळ खत उत्पादन.

प्रकल्पाची ६० टन क्षमता. खत चाळण्यासाठी यंत्राचा वापर.

१५ रुपये दराने विक्री. तीन किलो आणि ३० किलो बॅगमध्ये पॅकिंग.

व्हर्मिवॉशची प्रति लिटर ५० रुपये दराने विक्री. पाच लिटर कॅनमध्ये उपलब्धता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT