Bio-stimulants Agrowon
ॲग्रो विशेष

Bio Stimulant Company : जैव उत्तेजक कंपन्यांचे युनिट जागेवरच नाहीत

Agriculture Department News : जिल्ह्यात परवानाधारक असलेल्या काही जैव उत्तेजक (बायो स्टिम्यूलंद्स) उत्पादक कंपन्यांनी केंद्र शासनाच्या नियमावलीचा भंग केल्याचे कृषी विभागाच्या पथकाने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यात परवानाधारक असलेल्या काही जैव उत्तेजक (बायो स्टिम्यूलंद्स) उत्पादक कंपन्यांनी केंद्र शासनाच्या नियमावलीचा भंग केल्याचे कृषी विभागाच्या पथकाने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. यामुळे या कंपन्यांचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव कृषी आयुक्तालयाकडे पाठविण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.

नांदेड जिल्ह्यात १२ जैव उत्तेजक कंपन्यांना जैव उत्तेजक बनविण्यासाठी जी-२ प्रमाणपत्र देण्यात आले आहे. खत नियंत्रण आदेश १९८५ मधील खंड २० मध्ये असलेल्या तरतुदीनुसार जैव उत्तेजक उत्पादनांचे प्रमाणपत्र प्रदान करताना अटी-शर्तीचे पालन करणे बंधनकारक आहे.

परंतु राज्यात अनेक कंपन्यांकडून नियमाचा भंग केल्याचे उघड झाल्याने याबाबत तपासणी करण्यात येत आहे. यातील सर्वाधिक कंपन्यांनी केंद्राने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करत नसल्याचे दिसून आले आहे.

अनेक युनिट जागेवर नसल्याचे आढळून आले आहे. यासोबतच उत्पादक कंपन्यांच्या जागेवर प्रयोगशाळा नाहीत, उत्पादन बनविण्यासाठी लागणारी यंत्रसामग्रीही जागेवर नसल्याचे आढळून आले आहे. यामुळे या कंपन्यांकडून केवळ लेबलिंग लावून बाजारात कंपनीच्या नावावर उत्पादने विक्री करत असल्याचा संशय व्यक्त आहे.

यामुळे या कंपन्यांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. याबाबत कंपन्यांची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच लातूर विभागीय कृषी सहसंचालकांकडे सुनावणी घेण्यात आली. यात समाधानकारक खुलासा केला नसलेल्या कंपन्यांचे परवाने रद्द करण्यासाठी कृषी आयुक्तालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.

नांदेड जिल्ह्यातील जैव उत्तेजक कंपन्या

१) लिफ लाइप क्रॉप सायन्स (शिवाजीनगर नांदेड),

२) फ्युचेरा ॲग्रो केमिकल्स (मुक्रमाबाद, मुखेड),

३) राधागोविंद फर्टिलायझर्स ॲण्ड केमिकल्स लि, (श्रीराम फर्टिलायझर्स, नवा मोंढा, नांदेड),

४) सह्याद्री ॲग्रोटेक (वडगाव, तुप्पा नांदेड),

५) ग्रीनवर्ल्ड ॲग्रोटेक (एमआयडीसी, नांदेड),

६) एन एक्सपर्ट बायो सायन्स (मेन रोड तुप्पा नांदेड),

७) जिओ क्रॉपटेक (एमआयडीसी, नांदेड),

८) हिंदुस्थान क्रॉप सायन्स (एमआयडीसी, नांदेड),

९) ॲग्रोवेदा बायोटेक (नवीन मोंढा, नांदेड),

१०) प्लॅन्टेक्स क्रॉप सायन्स (इस्लामपूर, अर्धापूर, जि. नांदेड),

११) ग्रीनटच बायोटेक (गुरुजी चौक, नांदेड),

१२) ओमकार बायोटेक (भायेगाव रोड, तुप्पा, नांदेड).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT