Fish Exports Agrowon
ॲग्रो विशेष

Fish Exports : केवळ मत्स्यव्यवसायच नाही तर दुग्धव्यवसायही भविष्यात मैलाचा दगड ठरेल, केंद्रीय मंत्री राजीव रंजन उर्फ ​​लालन सिंह यांचा दावा

Aslam Abdul Shanedivan

Pune News : देशाच्या आर्थिक विकासात पशुधनाचे मोठे योगदान असून मत्स्योत्पादनामुळेही आर्थिक वृद्धी होत आहे. सध्या जागतिक मत्स्योत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असणारा आपला देश लवकरच पहिल्या क्रमांकावर असेल. दूध उत्पादनातही भारत पहिल्या क्रमांकावर आहे. भारताकडून चीज खरेदी करण्याची इच्छा ऑस्ट्रेलियाने व्यक्त केल्याचं, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ​​ललन सिंह यांनी दावा केला आहे. ते मंगळवारी (ता.१७) पत्रकार परिषदेत बोलत होते.

देशाच्या आर्थिक विकासात पशुधन महत्वाची भूमिका पार पाडत आहे. तसेच जागतिक मत्स्योत्पादनात भारताचा वाटाही वाढत असून तो आठ टक्के आहे. तर सध्या आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत. पण लवकरच आम्ही प्रथम स्थानावर असू. मच्छिमारांची सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा वाढवण्यात आल्याचेही यावेळी ललन सिंह म्हणाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील १०० दिवस पूर्ण झाल्यावरही वक्तव्य केलं.

मत्स्यपालन आणि मत्स्यपालन उत्पादन, पोषण, रोजगार, उत्पन्न आणि परकीय चलन मिळवण्याचे प्रमुख स्त्रोत बनले आहेत. सध्या निर्यातीतून ६० हजार कोटी रुपयांचे परकीय चलनाची भर पडत आहे. तीन कोटी मच्छीमार आणि मत्स्यपालकांना उपजीविकाही मिळत आहे. तसेच देशाच्या आर्थिक विकासात वृद्धी होत आहे. आता मच्छिमारांची सामाजिक व आर्थिक सुरक्षा वाढण्यात आल्याने निर्यातही वाढली आहे. त्यामुळेच या क्षेत्राकडून आणखी आशा वाढल्याचे ललन सिंह म्हणाले.

पुढे ललन सिंह म्हणाले, मत्स्यपालकांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी अनेक कार्यक्रम राबवले जात आहेत. यामुळेच जागतिक मत्स्योत्पादनात भारताचा वाटा वाढला असून लवकरच आपण प्रथम स्थानावर असू. २०१३-१४ मध्ये ३० हजार कोटींहून अधिक सागरी खाद्य निर्यात झाले आहे. यात आता दुप्पट वाढ झाली असून २०२३-२४ मध्ये ६० कोटी ५२३.८९ कोटी रुपयांची निर्यात झाली आहे. लॉबस्टरच्या निर्यातीत सर्वाधिक वाढ झाली असून मागील १० वर्षांच्या तुलनेत ती १०७ टक्क्यांनी वाढली आहे. लॉबस्टरची निर्याती १९ हजार ३६८ कोटींवरून ४० हजार ०१३.५४ कोटीं झाली आहे.

कृषी आणि संलग्न क्षेत्रातील एकूण मूल्यवर्धनामध्ये (GVA) पशुधनाचे योगदान २०१४-१५ मध्ये केवळ २४.३६ टक्के होते. पण २०२२-१३ मध्ये पशुधन ३०.२२ टक्के झाले आहे. या कालावधीत, दूध उत्पादनाचे मूल्य ४.९८ लाख कोटी रुपयांवरून १२५ टक्क्यांनी वाढले आहे. आता मूल्यवर्धनामध्ये पशुधनाचे योगदान ११.१६ लाख कोटी रुपये झाले. कृषी क्षेत्रात हे प्रमाण सर्वाधिक आहे. तर देशी गोवंशाच्या विकास आणि संवर्धनासाठी सरकार कटिबद्ध आहे. यासाठी नऊ कोटींहून अधिक जनावरांचे कृत्रिम रेतन करण्यात आल्याचीही माहिती ललन सिंह यांनी दिली आहे.

तर मत्स्यव्यवसायच नाही तर दुग्धव्यवसाय क्षेत्रातही आपली प्रगती होत आहे. दोन्ही क्षेत्रात सरकारकडून अनेक योजना आणल्या जात आहेत. येथे काम केलं जात आहे. त्यामुळे भविष्यात दोन्ही क्षेत्र मैलाचा दगड ठरतील. सध्या भारत दूध उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाला भारताकडून चीज विकत घ्यायचे आहे, असे ऑस्ट्रेलियाच्या राजदूतांची इच्छा व्यक्त केल्याचा दावा ललन सिंह यांनी केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert : उद्यापासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज; मराठवाडा आणि विदर्भात पावसाला पुन्हा सुरुवात होणार

Crop Damage : खानदेशात पावसाने पीकहानी सुरूच

Solar Power : पश्चिम विदर्भातील ६ हजार घरांवर सौर ऊर्जानिर्मिती

Suryaghar Yojana : छत्रपती संभाजीनगर परिमंडलात ३६५३ जणांना सूर्यघर योजनेचा लाभ

Majhi Ladki Bahin Yojana : तुम्ही ताकद द्या, ‘लाडकी बहीण’चा निधी वाढवू

SCROLL FOR NEXT