Fish Production : मत्स्य उत्पादनात महिलांचा सहभाग वाढविण्यावर सरकारचा जोर

Narendra Modi : भारत हा जगातील सर्वात मोठा दुसरा मत्स्य उत्पादक देश बनला आहे. २०१४ मध्ये देशात ८० लाख टन मत्स्य उत्पादन होत होते. Fisheries
Narendra Modi
Narendra ModiAgrowon
Published on
Updated on

Pune News : मत्स्य उत्पादनामध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यावर सरकारचा जोर असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मत्स्य संपदा योजनेअंतर्गत हजारो महिलांना सरकारकडून मदत करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मोदी यांच्या हस्ते पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या भूमिपूजनचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

मोदी म्हणाले की, भारत हा जगातील सर्वात मोठा दुसरा मत्स्य उत्पादक देश बनला आहे. २०१४ मध्ये देशात ८० लाख टन मत्स्य उत्पादन होत होते. मात्र, आजघडीला देशात १७० लाख टन मत्स्य उत्पादन होत आहे. केवळ १० वर्षामध्ये मत्स्य उत्पादनात दुपटीने वाढ झाली असल्याचे मोदी म्हणाले.

Narendra Modi
Fish Market : म्हाकुळ माशाच्या दरात घट

सागरी शक्तीची ताकद

मोदी पुढे म्हणाले, हा नवा भारत आहे. हा नवा भारत इतिहासातून धडा घेतो. गुलामीच्या प्रत्येक खुणा मागे टाकून, नवा भारत सागरी पायाभूत सुविधांमध्ये मैलाचे दगड पार करत आहे. एक काळ होता, जेव्हा भारताची गणना जगातील समृध्द आणि शक्तीशाली राष्ट्रांमध्ये केली जात होती. सागरी शक्ती ही भारताच्या समृध्दीचा प्रमुख आधार आहे. ही ताकद महाराष्ट्रापेक्षा जास्त कोणाल कळणार? असेही ते म्हणाले.

Narendra Modi
Fish Market : सिंधुदुर्गात मासळीच्या दरात घसरण

मच्छिमारांच्या कल्याणासाठी मंत्रालय

आमचे सरकार किनारपट्टीवरील गावांच्या विकासावर अधिक लक्ष देत असल्याचे मोदी यांनी यावेळी म्हटले. तुमच्या क्षमता वाढविण्यासाठी मच्छिमार संस्थांचे बळकटीकरण केले जात आहे. केंद्रातील एनडीए सरकारने स्वतंत्र आदिवासी मंत्रालय स्थापन केले आहे. तसेच आमच्या सरकारने मच्छिमारांच्या कल्याणासाठी वेगळे मंत्रालय केले आहे.

देशातील सर्वात मोठे कंटेनर बंदर

वाढवण बंदराच्या भूमिपूजनानंत बोलताना मोदी म्हणाले की, भारताच्या विकासाच्या प्रवासासाठी हा मोठा दिवस आहे. विकसित महाराष्ट्र हा विकसित भारताच्या संकल्पाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. महाराष्ट्रासाठी सातत्याने मोठे निर्णय घेण्यात आल्याचेही मोदी यावेळी म्हणाले.

विकासाठी महाराष्ट्राकडे आवश्यक सामर्थ्य आणि संसाधने आहेत. आज वाढवण बंदराची पायाभरणी करण्यात आली असून त्यासाठी ७६ हजार कोटी खर्च करण्यात येणार आहेत. हे देशातील सर्वात मोठी कंटेनर पोर्ट असणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com