Natural farming increased production Agrowon
ॲग्रो विशेष

Natural farming increased production: नैसर्गिक शेतीमुळे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढतं; केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांचा दावा

Minister Shivraj Chauhan : देशात १८ लाख शेतकरी साडेसात हजार हेक्टरवर नैसर्गिक शेती करत आहेत. नैसर्गिक शेतीचे आयसीएआरच्या शास्त्रज्ञानी १६ राज्यातील ४८४ शेतकऱ्यांच्या शेतात यशस्वी प्रयोग केले आहेत. त्यामुळे नैसर्गिक शेतीकडे शेतकऱ्यांना वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली.

Dhananjay Sanap

Sustainable Agriculture : देशात १८ लाख शेतकरी साडेसात हजार हेक्टरवर नैसर्गिक शेती करत आहेत. नैसर्गिक शेतीचे आयसीएआरच्या शास्त्रज्ञानी १६ राज्यातील ४८४ शेतकऱ्यांच्या शेतात यशस्वी प्रयोग केले आहेत. त्यामुळे नैसर्गिक शेतीकडे शेतकऱ्यांना वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लोकसभेत मंगळवारी (ता.४) दिली. प्रश्नोत्तराच्या तासात केंद्रीय मंत्र्यांना कॉँग्रेस खासदार शशी थरूर यांनी प्रश्न विचारला. त्यावर चौहान यांनी उत्तर दिलं. परंतु त्यांच्या उत्तराने थरूर यांचं समाधान झालं नाही.

यावेळी केंद्रीय कृषिमंत्री चौहान म्हणाले, "नैसर्गिक शेतीमुळे शेतकऱ्यांना आंतरपिकातून उत्पन्न मिळत, तसेच जैविक कर्ब २.५ टक्क्यांनी वाढत आणि उत्पादन खर्च २९ टक्के खर्चात बचत होते. रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची आरोग्य धोक्यात आलं आहे. त्यासाठी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन द्यावं लागत आहे." असंही चौहान यांनी सांगितलं.

यावर कॉँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी मात्र नैसर्गिक शेतीला आर्थिक पातळीवर किफायतशीर कशी करणार असा सवाल उपस्थित केला. थरूर म्हणाले, "इक्रीआर आणि आयआयएफएसआयच्या अहवालानुसार नैसर्गिक शेतीतुन उत्पादनात घट झाली आहे. बासमतीच्या उत्पादन ३२ टक्के तर गव्हाच्या उत्पादनात ५९ टक्के घट नैसर्गिक शेतीमुळे होते. तर उत्पादन खर्च अधिक आहे. तसेच मजुरांचा खर्च अधिक असून उत्पादन अल्प मिळतं. तसेच नैसर्गिक शेती करणाऱ्या ८७ टक्के शेतकऱ्यांना किफायतशीर दर मिळत नाही." याकडे शशी थरून यांनी लक्ष वेधलं.

खरं म्हणजे थरूर यांच्या शंका रास्त आहेत. नैसर्गिक शेतीत बहुतांश शेतकऱ्यांचे हात पोळले आहेत. मात्र केंद्र सरकार तरीही नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करत आहे, असं जाणकार सांगतात.

दरम्यान, महाराष्ट्रातील नाशिक आणि धुळे जिल्ह्यात २०२४ ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या कांदा, कापूस पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मदत मिळावी, अशी मागणी खासदार शोभा बच्छव यांनी केली. त्यावर कृषिमंत्री चौहान यांनी हा विषय राज्य सरकारचा आहे. मात्र तरीही गरज पडली केंद्र सरकार निश्चित मदत करेल, अशी ग्वाही दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Scheme: पशुपालकांसाठी महत्त्वाची योजना; मिळणार शून्य टक्के व्याजावर ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Irrigation Water Management Projects: सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पातर्फे शेतकऱ्यांना तुषार संच वितरित

Fishermen Relief: मच्छीमारांना दिलासा; पाच जिल्ह्यांतील केंद्रांचे आधुनिकीकरण

Rural Water Crisis: चाळीस गावांची पाण्यासाठी वणवण

PMGSY: 'पंतप्रधान ग्राम सडक योजने'ला २०२८ पर्यंत मुदतवाढ, ८३,९७७ कोटींची तरतूद, ग्रामीण वाड्या- वस्त्या शेती बाजारपेठांशी जोडणार

SCROLL FOR NEXT