Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department : पदनाम बदलाबाबत कृषी सहायकांशी सापत्न वागणूक

Unfair Treatment : राज्यात तलाठी तसेच ग्रामसेवक यांच्या पदनामात बदल करीत वेतनश्रेणीत वाढ शासनाने केली आहे. परंतु कृषी विभागाचा कणा असलेल्या कृषी सहायकांनी वारंवार मागणी करूनही नेहमी सापत्न वागणूक देत पदनामात बदल करण्यात आला नाही.

Team Agrowon

Akola News : राज्यात तलाठी तसेच ग्रामसेवक यांच्या पदनामात बदल करीत वेतनश्रेणीत वाढ शासनाने केली आहे. परंतु कृषी विभागाचा कणा असलेल्या कृषी सहायकांनी वारंवार मागणी करूनही नेहमी सापत्न वागणूक देत पदनामात बदल करण्यात आला नाही, असा आरोप कृषी सहायकांमधून केला जात आहे.

ग्रामपातळीवर तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक हे तीन घटक शासनाची कामे पार पाडत असतात. शासनाने महसूल विभागातील तलाठी तसेच ग्रामविकास विभागातील ग्रामसेवक यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्यांच्या पदनामात गेल्या काळात बदल करून वेतनश्रेणीत वाढ केली.

परंतु कृषी विभागाचा मुख्य कणा असलेल्या कृषी सहायकांनी वारंवार मागणी करूनही ही मागणी पूर्ण झाली नाही. सोबतच कृषी सहायकांना कुठल्याही साधनसामग्रीचा पुरवठा केला जात नाही. त्यामुळे योजनांचा भार वाहणाऱ्या कृषी सहायक संवर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला आहे. दुसरीकडे एकामागोमाग योजना कृषी सहायकांवर लादल्या जात आहेत.

कृषी सहायकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत वारंवार शासनाकडे मागणी करण्यात आली. बैठकांमध्ये सकारात्मक आश्‍वासनेही दिली गेली. परंतु निर्णय कागदावर येत नसल्याने कृषी सहायकांच्या मागण्या महिनोन् महिने सुटू शकलेल्या नाहीत.

नवीन सरकार, नवीन कृषिमंत्री कृषी सहायकांना न्याय देतील असे संघटनेच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी ‘अॅग्रोवन’शी बोलताना सांगितले. सध्या नागपुरात सुरू असलेल्या अधिवेशनात तरी याबाबत सकारात्मक निर्णय व्हावा अशी मागणीसुद्धा पुन्हा एकदा कृषी सहायकांमधून पुढे आली आहे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चार निर्णय; उपसा जलसिंचन योजनेसाठी वीज दर सवलतीला मुदतवाढ

Namo Installment : नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते वितरण

Goat Farming : यशस्वी शेळीपालनातील विशाल

Education Innovation: लिहायला लावणारा शिक्षक

Dairy Farming Success : संघर्षाला मिळाला पूर्णविराम

SCROLL FOR NEXT