Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Jalna Rain : जालना जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक

Rain Update : छत्रपती संभाजीनगर जालना व बीड या तीन जिल्ह्यात गत दोन-तीन दिवसांपासून आकाशात ढगांची गर्दी काही ठिकाणी अधून मधून रिमझिम पाऊस होतो.

Team Agrowon

Jalna News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत बहुतांश भागात शुक्रवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासात तुरळक, हलका, मध्यम, पाऊस झाला. जालना जिल्ह्यात पावसाचा जोर थोडा अधिक होता. या जिल्ह्यातील दोन मंडलांत अतिवृष्टी झाली.

छत्रपती संभाजीनगर जालना व बीड या तीन जिल्ह्यात गत दोन-तीन दिवसांपासून आकाशात ढगांची गर्दी काही ठिकाणी अधून मधून रिमझिम पाऊस होतो. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात जालना जिल्ह्यातील विरेगाव मंडलात ६९ मिलिमिटर तर जालना ग्रामीण मंडलात ७४.८ मिलिमीटर इतकी अतिवृष्टी झाली. जालना जिल्ह्यातील जालना, जाफराबाद, भोकरदन, मंठा, बदनापूर तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड, सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री या तालुक्यात पावसाचा जोर जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या तुलने जास्त होता. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुका पावसाला अपवाद होता इतर तालुक्यात काही अपवाद वगळता बहुतांश मंडलांत पावसाची हजेरी तुरळक, हलक्या स्वरूपाची होती.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर तालुक्यात सरासरी ६ मिलिमीटर, पैठण २.९, गंगापूर ४.२, वैजापूर २.२, कन्नड १९.१, खुलताबाद ४.६, सिल्लोड १९.५, सोयगाव १४.२, फुलंब्री १६.४ मिलिमीटर पाऊस झाला.

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात सरासरी १६.३ मिलिमीटर, जाफराबादमध्ये २७.७, जालन्यात ४१.९, अंबडमध्ये ३, परतुरमध्ये २.८, बदनापूरमध्ये १२.६, घनसावंगीमध्ये २.२ तर मंठा तालुक्यात २४.४ मिलिमीटर पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यात सरासरी १.५ मिलीमीटर, पाटोदा १.३, आष्टी ०.२, गेवराई ०.७, माजलगाव १०, अंबाजोगाई १.९, केज २.३, परळी २.७, धारूर १.४, शिरूर १.७ मिलिमीटर पाऊस झाला. वडवणी तालुक्यात पाऊस झाला नाही.

मंडलनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)

जालना जिल्हा

भोकरदन २२.३, सिपोरा ३५, धावडा १३.५, अन्वा १०.५, हसनाबाद १६.५, राजूर १०.५, जाफराबाद २८, माहोरा ३५, कुंभारझरी ३१.५, टेंभुर्णी २८, वरुड बुद्रुक १५.८, वाघरुळ ४५.८, नेर ३६, शेवली १६.५, रामनगर ४२.५, पाचन वडगाव ४२.५, दाभाडी १६.५,बावणे पांगरी २४.८, तळणी १५.५, डोकसाळ २४.८, पांगरी गोसावी ५०.३.

छत्रपती संभाजीनगर

भावसिंगपुरा ११.५, सिद्धनाथ वडगाव १२.३, गाजगाव १२.३, कन्नड ३१, चापानेर ३१, चिकलठाणा ३१, पिशोर ११.८, नाचनवेल १९, चिंचोली लिंबाजी १३,करंजखेड १३, नागद १४.५. सिल्लोड ३६.८,निल्लोड १७, गोळेगाव १५, आमठाणा २७.८, बोरगाव २७.८, अंभई २०, पालोद ११.५, शिवना १३.५, बनोटी २२.३, जरंडी १८.३, फुलंब्री १६.५, आळंद १३.५, पिरबावडा १९.५, वडोद बाजार ११.५, बाबरा २१.

बीड

माजलगाव १२.५, कीट्टी आडगाव २३.८.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indigenous Lifestyle: आदिवासींची निसर्गपूरक शेती अन् जीवनशैली

Farmer Safety: विविध दंश, विषबाधेपासून स्वसंरक्षणाच्या उपाययोजना

Maharashtra’s Grape Industry: जागतिक ‘व्हिजन’ ठेवून द्राक्ष उद्योगाची वाटचाल

Weekly Weather: राज्यात चांगल्या पावसाची शक्यता

Parbhani Cooperative Fraud: परभणीच्या तब्बल ४२ संस्थांची नोंदणी रद्द

SCROLL FOR NEXT