Wheat Is Geopathic Stress : जिओपॅथिक स्ट्रेस म्हणजे जमिनीतून येणाऱ्या विशिष्ट ऊर्जा लहरी. त्याचा परिणाम जमिनीतील सजीव व निर्जिवांच्या रचना व गुणधर्मावर होतो. सामान्यतः हा नकारात्मक प्रभाव असतो.
जमिनीत जिओपॅथिक स्ट्रेस तयार होण्याचे कारणे
जमिनीतील विविध खनिजामुळे तयार होणारे प्रभावक्षेत्र
जमिनीच्या पोटातील मोठमोठ्या खडकांमधील भेगा (फॉल्ट्स अँड फ्रॅक्चर्स), खडकांमधील घर्षणातून तयार होणारे प्रभाव
पाण्याच्या प्रवाहाचा खडकाशी होणाऱ्या घर्षणातून
पृथ्वीच्या चुंबकीय गुणधर्मामुळे तयार होणारे प्रभावक्षेत्र (मॅग्नेटिक फिल्ड).
जमिनीत स्फटिके (खडकाचा एक प्रकार) अधिक असलेल्या भागामध्येही विद्युत चुंबकीय क्षेत्र तयार होते.
ज्या भागात जनावरांची किंवा माणसांची हाडे मोठ्या प्रमाणात जमिनीत असतात, तिथे हाडातील फाॅस्फरसच्या विघटनातून तयार होणारी किरणोत्सारी आयसोटोप व त्यांची विशिष्ट किरणे (विशेषतः गॅमा) जमिनीतून वर येतात.
या व्यतिरिक्तही आजवर आपणास अज्ञात कारणे असू शकतात.
एकापेक्षा अधिक घटकांमुळे होणारी गुंतागुंत
विविध धातूंची अनेक खनिजे विपुल प्रमाणात
असलेल्या जमिनीमध्ये पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र आणि खनिजांची विद्युत वाहकता यामुळे विद्युतभर क्षेत्र तयार होते. हेच विद्युत चुंबकीय क्षेत्र जमिनीवर आणि हवेतही जाणवते.
भूकंपात जसे दोन वा अधिक महाकाय खडकांचे भेगेच्या ठिकाणी घर्षण होते, त्यातूनही विद्युत चुंबकीय क्षेत्र तयार होते.
जमिनीतील पाण्याचा प्रवाह आणि जमिनीवरील जि.पॅ.स्ट्रेस
विज्ञानाचा आधार
विज्ञानाच्या प्राथमिक माहितीनुसार, कोणतेही घर्षण ऊर्जा निर्मिती करते. उदा. गारगोटीचे दगड एकमेकावर घासून अग्नी निर्माण होतो. यंत्रात धातूचे दोन भाग एकमेकांवर घासत असतील तर त्यातून उष्णता निर्माण होते. काचेचा रॉड व लोकर यांच्या घर्षणातून किंवा केसातून कंगवा फिरवला तर स्थितिज विद्युत निर्माण होते.
धातूच्या गुंडाळ्यामधून (कॉइल) चुंबक फिरवले तर तारेत विद्युत वाहू लागते. आपण सर्वत्र वापरत असलेली वीज याच तंत्राने तयार होते. अगदी तशीच क्रिया पाण्याचा प्रवाह आणि खडक यांच्यात घडते. जमिनीतून वाहणारा पाण्याचा प्रवाह खडकाच्या भेगांमधून वाहत असतो. कुठे खूप हळूवार पाझरत पुढे जातो, तर कुठे त्याचा वेग थोडा जास्त असतो. पण या दोन्ही प्रकारात त्याचे व खडकाचे घर्षण होत असतेच.
पृथ्वीचे स्वतःचे चुंबकीय क्षेत्र आहे, त्यामुळे इथे खडक चुंबक म्हणून काम करतो तर पाण्याचा प्रवाह हा धातूच्या तारेची भूमिका करतो आणि यातून विद्युत निर्मिती होते. यामुळे तिथे विद्युतभरची (इलेक्ट्रो मॅग्नेटिक फिल्ड) निर्मिती होते.
त्याचा प्रभाव खडकातून केवळ जमिनीपर्यंतच येतो असे नाही, तर त्याच्या क्षमतेनुसार हवेत व वातावरणातही प्रभाव पाडते. यालाच ‘जिओपॅथिक स्ट्रेस’ म्हणतात. काही संशोधनामध्ये याला ‘ड्रॅगन लाइन्स’ म्हटलेय, तर काही ठिकाणी ‘कॅन्सर रेज’,‘अर्थ रे’ किंवा ‘सायलेंट किलर रे’ असेही उल्लेख आढळतात.
शरीरातील विद्युत आणि जिओपॅथिक प्रभाव
केवळ आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीत विद्युत भार आहे, असे नाही तर सर्व प्राणीमात्र आणि वनस्पतींमध्येही विद्युतभर असतो. आपल्या शरीराचे चैतन्य म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आपल्या शरीरातील विद्युत ऊर्जा. या विद्युत ऊर्जेवर जमिनीतून येणाऱ्या विविध ऊर्जा प्रवाहाचा परिणाम होतो. त्याला शरीर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत राहते. विशेषतः हृदय, मेंदू, मज्जा संस्था व इतर काही प्रमुख अवयवांवर याचा प्रभाव अधिक पडतो, असे अभ्यासक सांगतात.
हातात असलेले डाउझिंग राॅड का वळतात?
आपल्या शरीरात विद्युत भार असतो, जमिनीतून वाहत असलेल्या पाणी असलेल्या जागेतून जमिनीकडे विद्युत चुंबकीय क्षेत्र वरच्या दिशेला येते. यातील विद्युत भार शरीराच्या विद्युतभारापेक्षा कितीतरी पट अधिक असतो. या विद्युतभारामुळे आपल्या शरीरातील विविध धातूंच्या आयन अधिक सक्रिय होतात आणि शरीराचाही विद्युतभर आणखी वाढतो.
हा विद्युतधार हातातील रॉडमध्येही जातो. हे राॅड विद्युत प्रभावित होतात. त्यामुळे जिओपॅथिक स्ट्रेसच्या विद्युत भाराने त्यांची ही हालचाल होणे होते. रॉड आणि या झोनचा विद्युत भार सम असेल तर ते रॉड बाहेरच्या बाजूला वळतात किंवा एकमेकांपासून दूर जातात. विद्युतभर जर विषम असेल तर ते एकमेकांकडे आकर्षित होऊन आतल्या बाजूला वळतात.
नारळ का पडतो?
जिओपॅथिक स्ट्रेस झोनमधून जाताना नारळ गोल फिरतो, उभा राहतो किंवा पडतो. त्या मागील कारण जाणून घेऊ.
ही क्रिया घडण्यामागेही विद्युत भार असतो. नारळात गर, पाणी असून, त्यात विविध धातूंचे आयन असतात. त्यावरही एक विद्युत भार असतो. स्ट्रेसझोनमधील विद्युत चुंबकीय क्षेत्राचा प्रभावामुळे तो अधिक वाढतो. त्या व्यक्तीच्या शरीरातही त्याच वेळी विद्युत भार वाढलेला असतो. तोही नारळातील पाणी व गरापर्यंत पोहोचल्याने या आयन्सची क्रिया वेगाने होते. त्यामुळे नारळ आडवा ठेवलेला उभा राहतो आणि कधी कधी हातातून पडतोदेखील.
काही गैरसमज
पायाळू माणसाच्या हातावरच हा प्रयोग यशस्वी होतो असे नाही, तर कुणाच्याही हातावर आडवा नारळ उभा राहतो. मात्र हातात, पायात वा शरीरावर धातूचा दागिना, घड्याळ किंवा एखादी वस्तू नसावी. तशी असल्यास मात्र नारळ उभा राहात नाही. डाउझिंगचे राॅड फिरत नाहीत.
नारळ उभा राहिलेल्या ठिकाणी किंवा डाउझिंगने दाखविलेल्या स्थळावर पाणी न लागल्याचा अनुभव काही लोक सांगतात. त्यामागील अन्य तथ्य शोधणे आवश्यक असते. असा अनुभव आलेल्या स्थळांवर पाणी जमिनीत नक्कीच असते, पण त्याचे प्रमाण उपसण्याइतके असेलच असे नाही. अल्प प्रमाणात पाणी असले तरी अशा प्रकारचे अनुभव वर उल्लेखलेल्या विविध गुंतागुंतीच्या स्थितीमुळेही येऊ शकतात. नारळ व डाउजिंगमुळे पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज मिळू शकतो. काही अधिक अनुभवी लोक त्याच्या प्रमाणाचाही अंदाज लावू शकतात. अधिक अचूकतेसाठी विविध यंत्रे सध्या उपलब्ध होत आहेत. त्यांचा वापर करता येतो.
विशिष्ट रक्तगटाच्या व्यक्तीचेच डाउझिंग यशस्वी होते. हेही असत्य असून, प्रशिक्षण घेतलेली कोणतीही व्यक्ती डाउझिंग करू शकते. त्याचे परिणाम अभ्यासू शकते. नारळ व डाउजिंग हे जमिनीतील पाणी पाहण्याची खूप प्राचीन व प्राथमिक माध्यम आहे. मात्र जगभरातील शास्त्रज्ञांनी त्यावर बरीच मेहनत घेऊन विविध तंत्रे विकसित केली आहेत. पुणे येथील प्रा. अविनाश खरात आणि डॉ. नंदकुमार धर्माधिकारी यांनी नाव (NAAV) मीटर विकसित केले आहे. या यंत्राद्वारे जमिनीतील पाण्याची खोली, प्रवाहाची रुंदी व दिशा ९३ ते ९५ टक्के अचूकतेने ओळखता येते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक उपकरण (GP3D) यानेही पाणी शोधता येते. अशा आधुनिक तंत्राने आजवर सुमारे ५०० हून अधिक बोअरवेल्सचे अचूक स्थान शोधण्यात आले आहेत.
- सतीश खाडे, ९८२३०३०२१८,
(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.