Seed Stock Agrowon
ॲग्रो विशेष

Unauthorized Seed Stock : एक लाख रुपयांचा अनधिकृत बियाणे साठा जप्त

Team Agrowon

Yavatmal News : कृषी विभागाच्या पथकाने चिंचाळा (ता. मारेगाव) येथे केलेल्या हंगामातील पहिल्याच कारवाईत तब्बल एक लाख रुपयांचा अनधिकृत बियाण्यांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे सर्व जण फरार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

राज्यात यंदा १५ मे पासून बियाणे विक्रीस परवानगी देण्यात आली असताना अनधिकृत बियाणे विक्रेत्यांनी मात्र त्यापूर्वीच आपली दुकानदारी सुरू केली आहे. एचटीबिटीला परवानगी नसतानाही यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या क्षेत्रावर याची अनधिकृतपणे लागवड होते.

त्या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाच्या पथकाकडून आतापासूनच अशा प्रकरणांमध्ये कारवाईचा सपाटा लावण्यात आला आहे. त्यानुसार चिंचाळा येथे विलास वसंता चिकटे (वय ४४) हा आपल्या गोठ्यातून अनधिकृतपणे कपाशीच्या बियाण्यांची विक्री करीत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती.

बनावट ग्राहकाच्या माध्यमातून याची खातरजामा करीत पथकाने छापेमारी केली. या वेळी पोत्यांमध्ये अनधिकृत बियाण्यांचा साठा आढळून आला. या पोत्यांवर अजय भोयर (वणी, यवतमाळ) तसेच श्यामसुंदर (वणी, यवतमाळ) या नावाचा उल्लेख होता. तिरुपती कुरिअर प्रा. लि. (वडाळी) व शेखावत लॉजिस्टीक (नागपूर) अशा दोन कुरियरचे स्टीकरही पोत्यांवर होते.

चिंचाळा येथील विलास चिकटे याच्याकडे मिळालेल्या साठ्यावर कुरिअरचे स्टीकर व दोन पत्ते नमूद होते. अजय भोयर व श्यामसुंदर नामक व्यक्‍तीचे हे पत्ता आहेत. वणी येथील हे दोघे असून त्यांच्या पत्त्यावर हे अनधिकृत बियाणे पोचले आणि त्यांच्याकडून विलास चिकटे यांना त्याचा पुरवठा झाला. त्यामुळे या तिघांविरोधात तक्रार देण्यात आली. त्यावरून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र माळोदे, कृषी विकास अधिकारी, यवतमाळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT