Farmer Loan Waive  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Loan Waiver : उमरखेड बाजार समितीने घेतला कर्जमाफीचा ठराव

Umarkhed APMC : यंदाच्या खरिपात पेरणीसाठी पैशाची सोय करण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी, असा ठराव घेतल्याचे सभापती कृष्णा पाटील देवसरकर यांनी सांगितले.

Team Agrowon

Yavatmal News : उमरखेड बाजार समितीने पुन्हा एकदा शेतकरी हित जपत पहिल्याच बैठकीत संपूर्ण कर्जमाफीचा ठराव घेतला. समितीचे संचालक भीमराव पाटील चंद्रवंशी यांनी त्या संबंधीचा प्रस्ताव मांडला होता. या विषयावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर सर्वानुमते कर्जमाफीचा ठराव मंजूर करण्यात आला, अशी माहिती सभापती कृष्णा पाटील देवसरकर यांनी दिली.

उमरखेड बाजार समितीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या संचालकांची पहिलीच बैठक बाजार समितीच्या सभागृहात पार पडली. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला जास्तीचा दर कसा मिळेल तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलांना उमरखेड येथे राहण्यासाठी व्यवस्था करण्यासंदर्भातील धोरण ठरवण्यासंदर्भात विचार विनिमय करण्यात आला.

भविष्यात शेतकरी हिताच्या कामाला प्रथम प्राधान्य देण्याचेही संचालक मंडळाने ठरवले. तसेच व्यापारी वर्गातून पाच प्रतिनिधी घेऊन त्यांच्यासोबत चर्चा व सल्लामसलत करून त्या संबंधाने येणाऱ्या अडीअडचणींविषयी तसेच बाजार समितीचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्याचे ठरले.

यंदाच्या खरिपात पेरणीसाठी पैशाची सोय करण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी, असा ठराव घेतल्याचे सभापती कृष्णा पाटील देवसरकर यांनी सांगितले.

यावेळी बाजार समिती उपसभापती श्रीपाल आडे, संचालक प्रवीण पाटील मिरासे, प्रकाश नरवाडे, कैलास मोरे, गजानन गाडेकर, शिवराम कदम, सचिन देवसरकर, दैवशाली वानखेडे, चंद्रकला इंगळे, गजानन सोळंके, राजेश कवाने, गजानन देवसरकर, विश्वास कांबळे, भीमराव चंद्रवंशी, राधेश्याम भट्टड, विवेक कन्नावार, विकार खतीब व सचिव संदीप जाधव उपस्थित होते.

पीक उत्पादकतेला फटका

उमरखेड बाजार समितीने सरसकट कर्जमाफीचा ठराव मंजूर केला. हा ठराव स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून शासनाला पाठविण्यात येणार आहे. बाजार समितीमध्ये कर्जमाफीच्या मुद्यावर चर्चा झाली. वातावरणातील बदलामुळे नैसर्गिक आपत्तीच्या दिवसांत वाढ झाली आहे. पाऊसमान अनिश्‍चित झाल्याने त्याचाही पीक उत्पादकतेला फटका बसला आहे. या सर्व कारणांमुळे शेतीक्षेत्रात अनिश्‍चितता वाढल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिघडली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Crisis: अतिवृष्टी, महापुरात शेतकरी उघड्यावर

Agriculture Livestock Scheme: गाई-म्हशीसाठी ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान; शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी सरकारची योजना

Water Management: धरण व्यवस्थापन संहिता

Rain Crop Damage: सांगली जिल्ह्यातील सात हजार एकरांवरील पिके पाण्यात

Maharashtra Agricultural Council: कृषी परिषदेला मिळेना पूर्णवेळ संचालक

SCROLL FOR NEXT