Ujani Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Dam : उजनी धरणाची ५ जानेवारीलाच ‘मायनस’ची शक्यता

Ujani Dam Water Level : सोलापूर, नगर, पुणे, धाराशिव या चार जिल्ह्यांसाठी वरदायिनी असलेले उजनी धरण यंदा ५ जानेवारीलाच तळ गाठणार आहे.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर, नगर, पुणे, धाराशिव या चार जिल्ह्यांसाठी वरदायिनी असलेले उजनी धरण यंदा ५ जानेवारीलाच तळ गाठणार आहे. सध्या धरणात २१ टक्के उपयुक्त पाणीसाठा असून ‘एकरूख’नंतर आता सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडले जाणार असून जानेवारीत शेतीसाठी एक आवर्तन सोडले जाईल.

त्यानंतर मात्र फेब्रुवारी ते जून या काळात धरणातील पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवण्यात येणार आहे. अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील तब्बल ७२ गावांसाठीच्या एकरूख योजनेत पहिल्यांदाच उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. दोन ते अडीच टीएमसी पाणी हिप्परगा तलावात सोडले जात आहे.

त्याठिकाणाहून पुढे कॅनॉलद्वारे अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरी, कुरनूर बंधाऱ्यात नेण्यात येत आहे. आता २५ ते ३० डिसेंबर दरम्यान भीमा नदीतून सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्याचे नियोजन झाले आहे. त्यासाठी सहा ते सात टीएमसी पाणी सोडावे लागणार असल्याने ५ जानेवारीपर्यंत धरण उणे होईल,

असे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. साधारणतः: १ ते १० जानेवारी दरम्यान शेतीसाठी यंदाच्या वर्षातील शेवटचे आवर्तन सोडले जाईल, असेही त्यांनी सांगितले. फेब्रुवारीपासूनच टंचाईच्या झळा सोसाव्या लागणार असून त्याचा परिणाम उद्योग क्षेत्रावरही होवू शकतो, अशी स्थिती आहे.

उणे १५ टक्क्यांपर्यंत कॅनॉलद्वारे पाणी शक्य

उजनी धरणात सध्या ११ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असून सद्य:स्थितीत धरणातील एकूण पाणीसाठा ७५ टीएमसीपर्यंत आहे. पण, धरणात सध्या १८ ते २० टीएमसी गाळ साचलेला आहे. त्यामुळे ४४ टीएमसी पाणी वापरता येईल, मात्र त्यासाठी दुबार, तिबार पंपिंग करावे लागणार आहे. तत्पूर्वी, उणे १० ते १५ टक्क्यांपर्यंत कॅनॉलमधून शेतीसाठी पाणी सोडणे शक्य आहे. त्यामुळे जानेवारीत कालवा सल्लागार समितीतील बैठकीनुसार शेतीला एक आवर्तन सोडण्यात येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सातारा जिल्ह्यात खरीप पेरणी अंतिम टप्प्यात

Farmer Felicitation : ‘सीसीआरआय’च्या वर्धापन दिनी प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव

Melghat Water Scarcity : मेळघाटच्या पाणीटंचाईला ब्रेक

Nanded Water Stock : नांदेडमधील पाणीसाठा ३१ दलघमीने वाढला

Automated Weather Station : सांगलीत स्वयंचलित हवामान केंद्रासाठी ६९६ गावांत चाचपणी

SCROLL FOR NEXT