Ujani Dam : उजनी जलाशयात केत्तूर येथे आठ लाख मत्स्यबीज सोडले

Fish Seed : महाराष्ट्र शासन आणि मत्स्यव्यवसाय विभाग पुणे यांच्या वतीने उजनी जलाशयामध्ये एक कोटी मत्स्यबीज सोडण्याचा निर्णय झालेला आहे.
Stocking Of Fish Seed
Stocking Of Fish SeedAgrowon
Published on
Updated on

Solapur News : महाराष्ट्र शासन आणि मत्स्यव्यवसाय विभाग पुणे यांच्या वतीने उजनी जलाशयामध्ये एक कोटी मत्स्यबीज सोडण्याचा निर्णय झालेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी (ता. ८) केत्तूर (ता. करमाळा) येथे उजनी जलाशयात पोमलवाडी पुलाजवळ व महादेव मंदिराजवळ आठ लाख मत्स्यबीज सोडण्यात आले.

गेल्या २८ ते ३० वर्षांपासून उजनी जलाशयात कधीच इतके मोठ्या प्रमाणात मत्स्यबीज सोडण्यात आले नव्हते. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मत्स्य व्यवसाय विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज मोठ्या प्रमाणात उजनी जलाशयात मत्स्यबीज सोडण्यात आले.

Stocking Of Fish Seed
Fishing Ban : पिलांच्या मासेमारीवर निर्बंध

या वेळी जलसंपदा विभागाचे अधिकारी, मच्छीमार बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी जे मच्छीमार बांधव मासेमारी करतात त्यांच्यासाठी ही आनंदाची बाब होती.

Stocking Of Fish Seed
Mangoor Fish : उजनी जलाशयात प्रतिबंधित मांगूर मत्स्यपालनावर निर्बंध

या वेळी विजय शिखरे प्रादेशिक उपायुक्त मत्स्य व्यवसाय विभाग पुणे, जलसंपदा विभागाचे एस. एस. झोळ उपविभागीय अधिकारी, एस. आर. मगदूम शाखाधिकारी, के. एन. सौंदाने कनिष्ठ अभियंता व क्षेत्रीय कर्मचारी, भरत मल्लाव, चंद्रकांत नगरे, केत्तूरचे सरपंच सचिन वेळेकर, उपसरपंच भास्कर कोकणे, माजी सरपंच प्रवीण नवले, माजी सरपंच उदयसिंह मोरे पाटील,

पोलिस पाटील गणपत पाटील, भाजपचे किसान मोर्चाचे चिटणीस दादासाहेब येडे, भाजप जिल्हा सदस्य अमोल जरांडे, भाजप अ. जा. मोर्चाचे संघटन सरचिटणीस सचिन खराडे, पै. नितीन इरचे, मच्छीमार संघटनेचे हरिश्‍चंद्र कनिचे, रामदास कनिचे, अशोक पुतले, शहाजी कनिचे, सुनील नगरे, सोमनाथ कनिचे, हनुमंत कनिचे, सौरभ कनीचे यांचेसह मच्छीमार बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com