Ujani Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Dam Water Discharge : उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढवला

Bhima River Water Level : उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात पूर नियंत्रणासाठी सुरू असलेल्या विसर्गात रविवारी (ता. २७) पुन्हा वाढ करण्यात आली.

Team Agrowon

Solapur News : उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात पूर नियंत्रणासाठी सुरू असलेल्या विसर्गात रविवारी (ता. २७) पुन्हा वाढ करण्यात आली. त्यानुसार सकाळी दहाच्या सुमारास तब्बल ४० हजार क्युसेकपर्यंतचा विसर्ग भीमा नदीत सोडण्यात आला.

या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. परिणामी, तिकडील अतिरिक्त पाणी उजनी धरणाकडे सोडण्यात येत आहे.

रविवारी दौंडकडून धरणाकडे ३४ हजार २३३ क्युसेक इतके पाणी सोडण्यात येत होते. तर पुढे धरणातून नदीत ४० हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत होते. पाण्याच्या या वाढत्या विसर्गाने भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, तसेच नदीपात्रात जनावरे किंवा तत्सम साहित्य असल्यास ते तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सखल भागातील नागरिकांना तत्काळ सतर्क करण्याची विनंतीही प्रशासनाने केली आहे.

पाणीपातळी ९६ टक्क्यांवर

उजनी धरणातील पाणीपातळी रविवारी (ता. २७) सकाळी ४९६.६६० मीटर इतकी होती. तर एकूण साठा ११५.२३ टीएमसी आणि त्यापैकी उपयुक्त साठा ५१.५७ टीएमसी एवढा राहिला. तर पाण्याची टक्केवारी ९६.२६ टक्के इतकी राहिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT