Uddhav Thackeray Agrowon
ॲग्रो विशेष

Uddhav Thackeray : 'शेतकऱ्यांचे आश्रू पुसण्याची दाणत यांच्याकडे नाही' : उद्धव ठाकरे यांची भाजपसह मोदींवर टीका

Uddhav Thackeray On Modi And BJP : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्यादरम्यान अमरावतीमध्ये जाहीर सभेत भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शेतकरी आणि उद्योगावरून निशाना साधला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यात लोकसभा निवडणुकींची धामधूम सुरू झाली असून प्रचाराचा धुरळा उडत आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीचे दिग्गज नेते प्रचाराच्या मैदानात उतरले असून आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. यादरम्यान माजी मुख्यमंत्री तथा उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधला आहे. ठाकरे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न आणि गुजरातला जाणाऱ्या उद्योगावरून अमरावतीमध्ये जाहीर सभेत सोमवारी (ता.२२) टीका केली आहे.  

यावेळी ठाकरे म्हणाले, 'देशाला १० वर्षात लुटून टाकऱ्यांकडून देशभक्ती शिकायची गरज नाही. एकीकडे भाजपवाले काँग्रेवर टीका करतात मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मुलांच्या हाताला काम दिले जात नाही. शेतीपिकाला भाव नाही. म्हणून शेतकरी आत्महत्या करत आहेत. या शेतकऱ्यांसाठी आपल्या पंतप्रधानांनी दोन शब्द तरी बोलले का? नुसतं हे करू ते करूचं आश्वान दिले जात आहे. काँग्रेसने ६० वर्षात काय केलं विचारणाऱ्यानों आधी तुम्ही १० वर्षात काय केलात याचा हिशोब द्या', मग ३० वर्षांचे बघू असा हल्लाबोल ठाकरे यांनी केला आहे.

यावेळी 'गेल्या १० वर्षात किती शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले? किती शेतकऱ्यांना पिक विम्याचे पैसे मिळाले हे सांगा असा सवाल ठाकरे यांनी उपस्थिती केला. भाजपवाले आणि पंतप्रधान शेतकऱ्यांच्या घरी जाऊन जेवण करू शकता मात्र शेतकऱ्याचे आश्रू पुसण्याची दाणत त्यांच्यात नाही', अशी टीका ठाकरे यांनी केली आहे. 

'विदर्भात विकास झाला नाही अशी ओरड सध्या भाजपवाले करत आहेत. याबाबत पंतप्रधान मोदी यांनी देखील प्रचारसभेत टीका केली होती. मात्र आता आमच्या गद्दारांनाच घेऊन राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर भाजपने विदर्भातील विकासासाठी काय केलं? विदर्भाचा कोणता विकास केला? त्यांनी का विकास केला नाही. याचे उत्तर भाजपने द्यावे', असे देखील ठाकरे यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांना या सरकारने उपाशी ठेवले असून शेतकऱ्यांच्या शिकलेल्या पोरांसाठी मोदींनी एकतरी उद्योग आणला का?, नाही. उलट राज्याचे उद्योग गुजरातला नेले. जेथे जेथे जात आहे तिथे उद्योग गुजरातला उद्योग गेल्याचेचे ऐकण्यात येत असल्याचे ठाकरे म्हणालेत.

राज्यातील शेतकरी अडचणीत असताना त्याला बाहेर काढले जात नाही. पण मी मुख्यमंत्री असताना नागपूरच्या अधिवेशनात २ लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याची घोषणा मी केली होती. तर माझ्या निर्णयाने फक्त अंगठ्यावरती नुकसान भरपाई मिळाली होती. मात्र हे फक्त अंगठे दाखवत आहेत. मिळत काही नाही. आम्हाला भारत सरकार हवय, मोदी सरकार नको, असे देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटले

तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प मांडताना, शेतकरी, महिला, गरीब आणि युवा या चार जाती मांडल्या होत्या. पण आता यापैकी एका देखील जातीला भाजपने समाधानी केल्याचे दाखवा. शेतकरी, महिला, गरीब आणि युवा यामध्ये कोणीच समाधानी नाही. 

यानंतर सीतारमण म्हणाल्या पैसे नाहीत म्हणून निवडणूक लढाणार नाही. पण आम्ही निवडणूक रोखे परत आणू. तर देशाला खरं कोण लूटलं हे पाहायचे असेल तर भाजप आणि काँग्रेसच्या खात्यातले पैसे काढा म्हणजे सत्य समोर येईल. भाजपने अडीच वर्षात देशाला लुटले. मोदी की गॅरेंटी म्हणजे भ्रष्टाचार करा आणि भाजपमध्ये प्रवेश करा. यामुळे मोदी गॅरेंटी हवी की ठाकरेंचं वचन हे तुम्ही निवडा असे ठाकरे यांनी म्हटले आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Warehouse Receipt: पूर्व युरोप, मध्य आशिया खंडातील गोदाम पावती वित्तपुरवठा

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Whatsapp Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

SCROLL FOR NEXT