Loksabha Election Agrowon
ॲग्रो विशेष

Loksabha Election 2024 : साताऱ्यात उदयनराजेंचा ३२ हजार मतांनी विजय

Loksabha Election Result : सातारा लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत नवव्या फेरीअखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) शशिकांत शिंदेंची यांनी घेतलेले मताधिक्य १४ व्या फेरीत बदलले.

Team Agrowon

Satara News : सातारा लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत नवव्या फेरीअखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) शशिकांत शिंदेंची यांनी घेतलेले मताधिक्य १४ व्या फेरीत बदलले. त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली. २३ व्या फेरीअखेर उदयनराजे यांनी ३२ हजार २७४ मताधिक्य घेतले. त्यामुळे उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी जलमंदिर पॅलेसमध्ये जाऊन उदयनराजेंना खांद्यावर घेऊन जल्लोष केला. या वेळी उदयनराजेंना अश्रू अनावर झाले, तर पत्नी दमयंतीराजे यशाने भारावून गेल्या.

सातारा लोकसभा मतदार संघासाठी औद्योगिक वसाहतीतील वखार महामंडळाच्या गोदामात येथे मंगळवारी (ता. ८) सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. सकाळी मतमोजणीस सुरुवात झाल्यापासून शशिकांत शिंदे यांनी मताधिक्य घेण्यास सुरुवात केली. फेरीनिहाय मताधिक्य वाढत जात असल्याने त्यामुळे उदयनराजे भोसले समर्थकांत प्रचंड नाराजी पसरली होती. नवव्या फेरीअखेर शशिकांत शिंदेंनी १९ हजारांचे मताधिक्य घेतले होते.

१३ व्या फेरीअखेर शशिकांत शिंदेंना दोन हजार ७१८ मताचे मताधिक्य होते. या फेरीनंतर बाजी पलटली. सातारा, वाई आणि कराड उत्तर मतदार संघांच्या मोजणीत उदयनराजेंनी शशिकांत शिंदेंचे लिड तोडून मताधिक्य घेतले. १४ व्या फेरीनंतर उदयनराजेंनी एक हजारांचे मताधिक्य घेतले. त्यानंतर मताधिक्य वाढत गेले.

२० व्या फेरीअखेर १८ हजार ८७७ मताधिक्य मिळाल्यामुळे उदयनराजेंच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला. कार्यकर्ते थेट जलमंदिर पॅलेसवर पोहोचले आणि त्यांनी उदयनराजेंना खांद्यावर उचलून घेत जल्लोष केला. त्या वेळी उदयनराजेंना आनंदाश्रू आवरता आले नाहीत. तर दमयंतीराजेही भावुक झाल्या, तर राजमाता कल्पनाराजे यांनी उदयनराजेंना सावरले. सर्वांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.

सुरुवातीचे मताधिक्य मिळाल्याने जल्लोष करणारे शशिकांत शिंदेंच्या कार्यकर्त्यांची मात्र निराशा झाली. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष स्थापनेपासून हा मतदार शरद पवारच्या बालेकिल्ला राहिला होता. या प्रथमच भगदाड पाडून खासदार उदयनराजे भोसले यांच्या रूपाने भारतीय जनता पक्षाने हा मतदार संघ खेचून आणला जाणार आहे.

२३ व्या फेरीअखेर

उमेदवार पक्ष मते

उदयनराजे भोसले भाजप ५,६८,७४९

शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस

( शरद पवार गट) ५,३६,४७५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Whatsapp Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

SCROLL FOR NEXT