Agriculture University Agrowon
ॲग्रो विशेष

Rahuri Agricultural University : राहुरी विद्यापीठात कुलगुरूंविरोधातच प्राध्यापकांचे उपोषण

Aslam Abdul Shanedivan

Ahmednagar News : राहुरी कृषी विद्यापीठात कुलगुरू प्रशांतकुमार पाटील यांच्याविरोधातच दोन जेष्ठ प्राध्यापकांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. बुधवार (ता.१०) पासून दोन्ही जेष्ठ प्राध्यापकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. कुलगुरूंनी आपल्याला त्रास देण्याच्या उद्देशाने खोटी चौकशी लावली. तसेच मर्जीतल्या कनिष्ठ प्राध्यापकांना सेवाजेष्ठता डावलून अतिरिक्त पदभार दिला असा आरोप प्राध्यापक डॉ. मिलींद आहिरे आणि डॉ. दिनकर कांबळे यांनी केला आहे. तर विद्यापीठात कुलगुरूंविरोधातच प्राध्यापकांनी उपोषण सुरू केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

प्राध्यापक डॉ. मिलींद आहिरे आणी डॉ. दिनकर कांबळे यांनी कुलगुरू पाटील यांच्याविरोधातच उपोषण करत आहेत. तर गेल्या चार दिवसापासून कुलगुरूंच्या चेंबरच्या बाहेर हे उपोषण केले जात आहे. यावेळी सेवा जेष्ठतेची यादी डावलून मर्जीतल्या लोकांना नियुक्त्या कुलगुरूंनी दिल्या. तर या नियुक्त्या आपल्यावर अन्याय करण्याऱ्या असल्याचे प्राध्यापक डॉ. आहिरे आणी डॉ. कांबळे यांचे म्हणणे आहे.

मात्र प्राध्यापक डॉ. आहिरे आणी डॉ. कांबळे यांचे उपोषण बेकायदेशीर असल्याचे कुलसचिव अरूण आनंदकर यांनी म्हटले आहे. तसेच विद्यापीठातील या दोन्ही प्राध्यापकांचे उपोषण कृषी विद्यापीठाच्या हिताच्या दृष्टीने योग्य नसल्याचेही कुलसचिव आनंदकर यांनी म्हटल आहे.

यावेळी कुलसचिव आनंदकर यांनी प्रसिद्ध पत्रकातून स्पष्टीकरण दिले असून प्राध्यापक डॉ. आहिरे आणी डॉ. कांबळे यांनी ते मागासवर्गीय असल्यानेच अन्याय झाल्याचे म्हटले होते. मात्र विद्यापीठाच्या निवड पद्धती आणि नामांकनाद्वारेच पद भरती करण्याबाबत कार्यकारी परिषदेने ठराव पारित केला आहे. त्यामुळेच उपोषणकर्त्या प्राध्यपकांच्या पदोन्नतीचे अर्ज एमसीएइआरकडे पाठवण्यात आली नाहीत. तर शासनाच्या जंपींग आरक्षणाच्या नियमाप्रमाणेच आरक्षणाचा लाभ देता येत नाही. एखाद्याला पुढील पदावर बढती देता येत नाही असेही स्पष्टीकरण कुलसचिव आनंदकर यांनी दिले आहे.

तर उपोषण करणाऱ्या दोन्ही प्राध्यपकांची विभागनिहाय चौकशी केली जात आहे. दोन्ही प्राध्यपकांना उच्च पदांच्या अर्जासाठी चौकशीच्या आधीन राहून ना हरकत दाखला देण्यात आला आहे. तर विद्यापीठात ५० टक्के पेक्षा जास्त वरिष्ठ पदांवर मागासवर्गीय अधिकारी कार्यरत आहेत. त्यामुळे प्राध्यापक डॉ. आहिरे आणी डॉ. कांबळे यांच्या आरोपात तथ्य नाही. तसेच त्यांचे उपोषण बेकायदेशीर असल्याचेही कुलसचिव आनंदकर यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Procurement Center : मका, सोयाबीन किमान आधारभूत खरेदी केंद्रे सुरू करावीत

Rabi Season 2024 : शेतात गाळ, माती, शेणखत टाकण्यास वेग

Solapur DPDC Meeting : ‘जिल्हा वार्षिक’मधील कामांची निविदा प्रक्रिया त्वरित राबवा

Grape Farming : ग्राहक मागणीभिमुख द्राक्ष उत्पादन, विपणन काळाची गरज

Kasuri Methi Market: जास्त उत्पादन देणारी कसुरी मेथीची शेती कशी कराल ?

SCROLL FOR NEXT