Parbhani News : हैदराबाद येथील भारतीय तेलबिया संशोधन संस्थेच्या (आयआयओआर) २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी झालेल्या कार्यशाळेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील करडई संशोधन केंद्राने विकसित केलेल्या व तेलाचे प्रमाण अधिक असलेल्या करडईच्या पीबीएनएस २२१, पीबीएनएस २२२ या वाणांची महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटकांत प्रसारणासाठी शिफारस करण्यात आली.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित करडई संशोधन प्रकल्पांतर्गत हे वाण विकसित करण्यासाठी कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा यांचे मार्गदर्शन, संशोधन संचालक डॉ. के. एस. बेग यांचे सहकार्य लाभले. करडई पैदासकार डॉ. एस. बी. घुगे, डॉ. आर. आर. धुतमल, वैज्ञानिक व तांत्रिक कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे.
पीबीएनएस २२१ वाणामध्ये तेलाचे प्रमाण ३४ टक्के (हेक्टरी ५२५ किलो) तर पीबीएनएस २२२ वाणाचे तेल उत्पादन ३४.४ टक्के (हेक्टरी ५३३ किलो) आहे. हे जिरायती आणि बागायती क्षेत्रात लागवडी योग्य आहेत. या वाणांची उत्पादकता जिरायती क्षेत्रात हेक्टरी १५ क्विंटल, तर बागायती क्षेत्रात हेक्टरी १८ ते २० क्विंटल आहे.
हे दोन्ही वाण पानावरील ठिपके (अॅल्टरनेरिया लीफ स्पॉट) यांसारख्या रोगांसाठी मध्यम प्रतिकारक्षम आहेत. विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित करडई संशोधन प्रकल्पाने जिरायती शेतीमध्ये उच्च उत्पादनक्षम, तेलाचे प्रमाण जास्त आणि तांत्रिकदृष्ट्या सुधारित करडई वाणांची निर्मिती करण्यावर भर दिला आहे.
आजवर करडईचे शारदा, पीबीएनएस १२ (परभणी कुसुम), पीबीएनएस ४० (सेमी स्पायनी), पीबीएनएस ८६ (पूर्णा), पीबीएनएस १८४ आणि पीबीएनएस १५४ (परभणी सुवर्णा) हे वाण लोकप्रिय झाले आहेत. मराठवाड्यातील करडई लागवड क्षेत्रामध्ये ९० टक्के क्षेत्र हे वाणांचे आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.