डॉ. अनिल राजगुरू, डॉ. आदिनाथ ताकटे, डॉ. मंगेश दुधे
Safflower Cultivation : कोरडवाहू क्षेत्रामध्ये रब्बी हंगामातील महत्त्वाचे तेलबियाचे पीक म्हणजे करडई. करडई हे कमी पाण्यात येणारे व अवर्षणाचा ताण सहन करणारे पीक आहे. करडईची मुळे ही जमिनीमध्ये खोल जात असल्यामुळे खालच्या थरांतील अन्नांश व ओलाव्याचा उपयोग करून घेते. या पिकाच्या पानावर काटे येत असल्यामुळे पर्णोत्सर्जन कमी होते व प्रतिकूल परिस्थितीत हे पीक तग धरते.
कमी उत्पादन खर्चामध्ये उत्पादन मिळत असल्याने हे पीक कोरडवाहूसाठी वरदान ठरले आहे. करडई लागवडीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास अधिक फायदा मिळवता येतो. महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत करडई संशोधन प्रकल्प, सोलापूर येथे करडईचे विविध वाण कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रसारित करण्यात आलेले आहेत. बिनकाट्याच्या जातीमध्ये फलटण येथील निंबकर संशोधन संस्था यांनी नारी - ६ हा सरळ वाण आणि नारी एन.एच.-१ हा संकरित वाण प्रसारीत केलेला आहे.
प्रसारित वाण व वैशिष्ट्ये ः
भीमा :
- प्रसारण वर्ष १९८२
-महाराष्ट्रातील कोरडवाहू क्षेत्रात लागवडीसाठी शिफारस
- अवर्षणास प्रतिकारक, मावा कीड तसेच मर रोगास मध्यम प्रतिकारक
- तेलाचे प्रमाण २९-३० टक्के
- फुलाचा रंग उमलताना पांढरा, वाळल्यावर फिक्कट पांढरा व मध्यभागी लालसर ठिपका
- पीक कालावधी १३० ते १३५ दिवस
- उत्पादकता ः १३ ते १५ क्विं./हे.
फुले कुसुमा ः
- प्रसारण वर्ष २००३
- कोरडवाहू तसेच संरक्षित पाण्याखाली योग्य
- मावा किडीस मध्यम प्रतिकारक, फुलाचा रंग उमलताना पिवळा, वाळल्यानंतर लाल.
- तेलाचे प्रमाण ३० टक्के
- पीक कालावधी १३५ ते १४० दिवस
- उत्पादकता ः कोरडवाहू १३ ते १५ क्विं./हे., बागायती: २० ते २२ क्विं./हे.
एस.एस.एफ. ७०८ ः - प्रसारण वर्ष २०१० - पश्चिम महाराष्ट्र लागवडीसाठी योग्य, कोरडवाहू तसेच बागायती - मावा किडीस मध्यम प्रतिकारक - फुलाचा रंग उमलताना पिवळा, वाळल्यानंतर लाल - तेलाचे प्रमाण ३१ टक्के - पीक कालावधी ११५ ते १२० दिवस - उत्पादकता ः कोरडवाहू १३ ते १५ क्विं./हे., बागायती ः २० ते २२ क्विं./हे. फुले करडई (एस. एस. एफ. ७३३) ः - प्रसारण वर्ष २०११ - कोरडवाहू लागवडीसाठी - मावा किडीस मध्यम प्रतिकारक - तेलाचे प्रमाण २९ टक्के - फुलाचा रंग उमलताना पांढरा, वाळल्यानंतर फिक्कट पांढरा, झाडांची उंची मध्यम - पीक कालावधी ः १२० ते १२५ दिवस - उत्पादकता ः कोरडवाहू १३ ते १५ क्विं./हे.
एस. एस. एफ. ७४८ (फुले चंद्रभागा) ः - प्रसारण वर्ष २०१२ - कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी - तेलाचे प्रमाण २९ टक्के - मावा किडीस मध्यम प्रतिकारक - फुले उमलताना पिवळी पडल्यावर लाल - पीक कालवधी १३० ते १४० दिवस - उत्पादकता ः कोरडवाहू १३ ते १५ क्विं./हे., बागायती : २० ते २२ क्विं./हे. फुले भिवरा (एस.एस.एफ. १३-७१) ः अखिल भारतीय स्तरावर कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी - पानावरील ठिपके रोगास प्रतिकारक्षम - तेलाचे प्रमाण २९.२ टक्के - मर रोग व मावा किडीस मध्यम प्रतिकारक - पीक कालावधी १२५ ते १२६ दिवस - उत्पादकता ः २० क्विं./हे फुले नीरा (एस.एस.एफ. १२-४०) ः - प्रसारण २०२० - अखिल भारतीय स्तरावर कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी - मावा किडीस व मर रोगास मध्यम प्रतिकारक - पीक कालवधी १२० ते १२५ दिवस - तेलाचे प्रमाण ३२.९ टक्के - उत्पादकता ः कोरडवाहू १३ ते १५ क्विं./हे., बागायती ः २० ते २२ क्विं./हे. फुले गोल्ड (एस.एस.एफ. १५-६५) - प्रसारण वर्ष २०२१ - अखिल भारतीय स्तरावर कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी - सर्वाधिक तेलाचे प्रमाण ३४.६ टक्के - मर रोगास मध्यम प्रतिकारक - पिकाचा कालावधी १२० ते १२५ दिवस - उत्पादकता ः कोरडवाहू ः १४ ते १६ क्विं./हे., बागायती २० ते २२ क्विं./हे. फुले किरण (एस.एस.एफ. १६-०२) - प्रसारण वर्ष २०२१ - अखिल भारतीय स्तरावर कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी - तेलाचे प्रमाण ३०.५ टक्के - मावा किडीस मध्यम प्रतिकारक - पिकाचा कालावधी ः १२५ ते १३० दिवस - उत्पादकता ः कोरडवाहू २० ते २५ क्विं. /हे, बागायती २४ ते २५ क्विं./हे. पी.बी.एन.एस. -१२ - अखिल भारतीय स्तरावर कोरडवाहू, तसेच बागायती लागवडीसाठी योग्य, मराठवाडा विभागास योग्य. - मावा किडीस मध्यम प्रतिकारक - पिकाचा कालावधी ः १३० ते १३५ दिवस - उत्पादन ः १२ ते १५ क्विं./हे. पी.बी.एन एस. ८६ (पूर्णा) ः - मराठवाडा विभागात कोरडवाहू व बागायती लागवडीसाठी प्रसारित - पिकाचा कालावधी ः १३० ते १३५ दिवस - उत्पादकता ः कोरडवाहू :१४-१६ क्विं./हे., बागायती : २० ते २५ क्विं./हे. अकोला पिंक ः - विदर्भात लागवडीसाठी प्रसारित - पिकाचा कालावधी ः १३० ते १३५ दिवस - उत्पादन ः १२ ते १५ क्विं./हे ------------------ बिन काटेरी वाण ः १) एस.एस.एफ. ६५८ - प्रसारण वर्ष २००८ - बिन काटेरी वाण - अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी शिफारस - मावा कीड व मर रोगास मध्यम प्रतिकारक - तेलाचे प्रमाण २८ टक्के - फुलाचा रंग उमलताना पिवळा व वाळल्यावर विटकरी लाल - पिकाचा कालावधी ११५ ते १२० दिवस - उत्पादकता ः १२-१३ क्विं./हे. २) नारी ६ - प्रसारण वर्ष २००० - बिन काट्याची, पाकळ्या गोळा करण्यास योग्य - पिकाचा कालावधी १३० ते १३५ दिवस - उत्पादन ः १० ते १२ क्विं./हे. ३) नारी एन एच १ (संकरित वाण) - प्रसारण वर्ष २००१ - बिन काट्याचा वाण - पाकळ्या गोळा करण्यास योग्य - पिकाचा कालावधी ः १३० ते १३५ दिवस - उत्पादन ः १२ ते १४ क्विं./हे. -------------------------------------------------------
संपर्क ः डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९ (डॉ. राजगुरू हे करडई संशोधन प्रकल्प, सोलापूर येथे करडई पैदासकार, डॉ. दुधे हे भारतीय तेलबिया संशोधन संस्था, हैदराबाद येथे वरिष्ठ शास्रज्ञ तर डॉ. ताकटे, हे एकात्मिक शेती पद्धती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.