Heavy Rain Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : नगर जिल्ह्यात एका महिन्यात पावसाने दोनशे हेक्टरवर नुकसान

Pre Monsoon Rain : नगर जिल्ह्यात गेल्या महिनाभरात पूर्वमोसमी पावसाने चांगलाच फटका बसला आहे. साधारण ५५ गावांत २०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर शेतपिकांचे नुकसान झाले.

Team Agrowon

Nagar News : नगर जिल्ह्यात गेल्या महिनाभरात पूर्वमोसमी पावसाने चांगलाच फटका बसला आहे. साधारण ५५ गावांत २०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर शेतपिकांचे नुकसान झाले. अनेक घरांची पडझ़ड झाली असल्याचा प्रशासनाचा अहवाल आहे. पिकांच्या नुकसानीसाठी चाळीस लाखांपेक्षा अधिक रक्कम मिळावी यासाठी सरकारकडे मागणी केली आहे. पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत.

नगर जिल्ह्यात प्रामुख्याने कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नगर, श्रीगोंदा, जामखेड, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता, अकोले, पारनेर तालुक्यांत पूर्वमोसमी पावसाचा मोठा फटका बसला आहे.

फळपिकांचा साधारण ३० गावांत साठ हेक्टपेक्षा अधिक क्षेत्राला फटका बसला असून प्रामुख्याने आंबा, लिंबू, चिकू, संत्रा, केळी, डाळिंबाला फटका बसला असून फळपिकांत मका, उन्हाळी बाजरी, मका पिकाला फटका बसला आहेनगर जिल्ह्याच्या उत्तर आणि दक्षिण भागात आधी पूर्वमोसमी आणि आता पूर्वमोसमी पाऊस पडत आहे.

अकोले, राहाता तालुक्यांतील अनेक गावांमधील झाडे उन्मळून पडले. वीजवाहक तारांवर झाडे पडल्याने अनेक गावांतील वीज पुरवठ्यावर परिणाम झाला. अलीकडे दोन दिवसांपूर्वी श्रीरामपूर, कोपरगाव तालुक्यांत मोठा फटका बसला असून तेथे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असून, नुकसानीचा आकडा वाढू शकतो असे सांगण्यात आले. गेल्या महिना, दीड महिन्यात वीज पडून जीवित हानीही झालेली आहे.

महिनाभरातील स्थिती

एकूण बाधित गावे ५५

एकूण बाधित शेतकरी ४००

फळपिकांखालील बाधित क्षेत्र ६० हेक्टर

अन्य पिकांचे बाधित क्षेत्र १४० हेक्टर

अपेक्षित नुकसान भरपाईसाठी निधी ३८ लाख

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT