Leopard Attack Agrowon
ॲग्रो विशेष

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या, एक मेंढी ठार

Leopard Terror : आळेफाटा परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या व एक मेंढी ठार तर दोन शेळ्या जखमी झाल्याची घटना सोमवारी (ता. १६) घडली.

Team Agrowon

Pune News : आळेफाटा परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या व एक मेंढी ठार तर दोन शेळ्या जखमी झाल्याची घटना सोमवारी (ता. १६) घडली. आळेफाटा परिसरातील आळे, राजुरी, वडगाव कांदळी, जाधववाडी, बोरी बुद्रूक, कोळवाडी, संतवाडी, या गावांमध्ये दिवसेंदिवस बिबट्याचे पाळीव प्राण्यांवर हल्ले वाढतच चालले आहे.

वडगाव कांदळी येथील उत्तम पाचपुते यांच्या शेळ्यावर बिबट्याने हल्ला करून तीन शेळ्या ठार तर दोन शेळ्या जखमी केल्या आहेत. यामध्ये उत्तम पाचपुते यांचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान‌ जाधववाडी या ठिकाणी जनार्दन पांडुरंग लोखंडे यांच्या शेतात बसलेल्या धनगरांच्या वाड्यावर सोमवारी सायंकाळच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून एक मेंढी ठार केली.

या मळ्यात पाळीव प्राण्यांवर झालेली आठवड्यातील चौथी घटना असून येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेतात पाणी भरण्यासाठी जाण्यास भीती वाटत आहे. या परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर वाढला आहे या गोष्टीकडे लक्ष देऊन वनविभागाने पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT