Integrated Crop Management Agrowon
ॲग्रो विशेष

Integrated Crop Management : रोग-किडीचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करावे

Cop Pest Disease Management : सोयाबीनमध्ये चक्री भुंगा व मोझॅक या सर्वांचे नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करा. कापूस पिकात सघन पद्धतीने लागवडीतून उत्त्पन्न चांगले येण्याची क्षमता आहे.

Team Agrowon

Jalna News : किडी व रोगामुळे पिकाचे नुकसान जास्त होते. पिकाच्या शाश्वत उत्पादनासाठी किडी व रोगाचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करावे, असे कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक व वरिष्ठशास्त्रज्ञ एस. व्ही. सोनुने यांनी सांगितले.

कापूस व सोयाबीन पिकातील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन या विषयावरील दोन दिवशीय विस्तार अधिकारी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी श्री. सोनुने बोलत होते. याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे, कीटकशास्त्रज्ञ प्रा. अजय मिटकरी, मृदशास्त्रज्ञ प्रा. राहुल चौधरी, कृषी अभियंता, प्रा. पंडित वासरे, घेटुळी येथील प्रगतशील शेतकरी रावसाहेब मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.

बी. टी. कापसामधे रस शोषण करणाऱ्या किडी व शेंदरी बोंडआळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. सोयाबीनमध्ये चक्री भुंगा व मोझॅक या सर्वांचे नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करा. कापूस पिकात सघन पद्धतीने लागवडीतून उत्त्पन्न चांगले येण्याची क्षमता आहे.

कापूस व सोयाबीन पिकामध्ये नवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे हे तंत्रज्ञान कृषी विस्तार अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणे आवश्यक आहे, असेही श्री. सोनुने यांनी केले.

अन्नद्रव्य व्यवस्थापनातून पिकाची रोग प्रतिकार शक्ती वाढवणे या विषयावर प्रा.राहुल चौधरी यांनी मार्गदर्शन केले. कापूस व सोयाबीन पिकातील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन याविषयी प्रा. अजय मिटकरी यांनी मार्गदर्शन केले. प्रा पंडित वासरे यांनी पाणी व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. कचरेवाडी येथील प्रगतिशील शेतकरी जगदीश जाधव यांच्या कापूस व सोयाबीन या प्रात्यक्षिकास भेट दिली.

या वेळी प्रा.मिटकरी यांनी प्रशिक्षणार्थींना मित्र व शत्रू किडींची प्रत्यक्ष शेतावर ओळख करून दिली व कीड व्यवस्थापनाच्या पद्धती संदर्भात मार्गदर्शन केले. प्रशिक्षणादरम्यान परतूर विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी राम रोडगे यांनी प्रशिक्षणास भेट देऊन क्रॉप सॅप संदर्भात मार्गदर्शन केले. समारोपीय कार्यक्रमास पी. डी. जोशी यांनी मार्गदर्शन केले. आभार प्रा पंडित वासरे यांनी मानले

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Compensation : ३४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी, गारपीटसाठी अनुदान मंजूर; राज्य सरकारचा निर्णय

Desi Cow : शेती, आरोग्यासाठी देशी गोवंश संवर्धनावर लक्ष द्या

Agrowon Podcast: गव्हाचा बाजार स्थिरावला, ढोबळी मिरची-टोमॅटो तेजीत; भेंडी व हळद दर टिकून

Paddy Plantation : शिराळा तालुक्यात भात पेरणी ५० टक्के

Agriculture Irrigation : उष्णता वाढल्याने सिंचनाची लगबग

SCROLL FOR NEXT