Turtle Conseravtion Agrowon
ॲग्रो विशेष

Turtle Nest : चार किनाऱ्यांवर प्रथमच आढळली कासवांची घरटी

Turtle Conservation : जिल्ह्यातील चार किनाऱ्यांवर यंदा प्रथमच कासवांची घरटी आढळली असून, तिथे स्वतंत्रपणे कासव संरक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कासवांची वीण होणाऱ्या किनाऱ्यांची संख्या १६ वरून २३ झाली आहे.

राजेश कळंबटे

Ratnagiri News : जिल्ह्यातील चार किनाऱ्यांवर यंदा प्रथमच कासवांची घरटी आढळली असून, तिथे स्वतंत्रपणे कासव संरक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कासवांची वीण होणाऱ्या किनाऱ्यांची संख्या १६ वरून २३ झाली आहे.

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांमधील काही प्रमुख किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांची घरटी आढळतात. यंदा ऑलिव्ह रिडले कासवांनी रत्नागिरीतील काही किनाऱ्यांना नव्याने जवळ करत काळबादेवी, अन्सुरे (दांडे), आंबोळगड आणि गणेशगुळे किनाऱ्यांवर घरटी केली आहेत.

यापूर्वी या किनाऱ्यांवर कासवाची घरटी आढळत नव्हती. रत्नागिरी जिल्ह्यात ऑलिव्ह रिडले कासवांच्या विणीचे १६ किनारे होते, आता त्यामध्ये नव्याने आणखी चार किनाऱ्यांची भर पडली आहे. आडे, मालगुंड आणि रोहिले या किनाऱ्यांवरील यापूर्वी स्वतंत्रपणे कासव संरक्षणाचे काम पाहिले जात नव्हते.

आडे किनाऱ्यावरील घरट्यांमध्ये सापडणारी कासवांची अंडी ही आंजर्ल्यात, मालगुंडची गणपतीपुळेमध्ये आणि रोहिलेची तवसाळ किनाऱ्यावर आणून त्याठिकाणी संरक्षित केली जात होती.

मात्र, यंदा कांदळवन कक्ष दक्षिण कोकण विभागाकडून या किनाऱ्यांवर स्वतंत्रपणे कासव संरक्षणाची मोहीम सुरू करण्यात आली असून संरक्षणासाठी स्वतंत्र ‘बीच-मॅनेजर’ची नियुक्ती करण्यात आली आहे.

या ठिकाणी आढळली कासवांची घरटी नव्या करणाऱ्यांमधील काळबादेवी येथे पाच, अणसुरे (दांडे) येथे सात, आंबोळगड येथे सहा आणि गणेशगुळे येथे चार कासवांची घरटी आजतागायत आढळून आली आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Crop Insurance : नांदेडमधील पीकविमा परतावा वितरणासाठी मुहूर्त ठरेणा

Fish Farming : कृषी विभागातर्फे शेती, मत्स्यपालनाचे धडे

Paddy Plantation : पावसामुळे मुरूड तालुक्यातील भात लावणीचे काम पूर्ण

Crop Insurance Scheme : सांगली जिल्ह्यात ८१ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

Banana Crop Insurance : केळीविमाधारकांच्या परताव्यांना विलंब शक्य

SCROLL FOR NEXT