Turmeric  Agrowon
ॲग्रो विशेष

Turmeric Season : देशातील हळदविक्री हंगाम अंतिम टप्प्यात

Team Agrowon

अभिजित डाके ः अॅग्रोवन वृत्तसेवा
Turmeric Rate : सांगली ः देशातील हळद विक्रीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे हळदीच्या बाजारपेठेत ३० ते ३५ हजार पोत्यांची आवक होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून ही आवक कमी झाली आहे. दोन व तीन प्रतींच्या हळदीच्या दरात गेल्या चार दिवसांत प्रतिक्विंटलला एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे. तर उच्च प्रतीचा दर टिकून आहे. सध्या दरात चढ-उतार होण्याची शक्यता नसल्याचा अंदाज हळद उद्योगातील जाणकांनी व्यक्त केला आहे.

देशातील प्रत्येक बाजार समितीत हळदीच्या सौद्याला ६ हजार ते २० हजार पोत्यांची आवक होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून हळदीची आवक कमी होऊ लागली आहे. या वर्षीच्या हंमागाच्या सुरुवातीपासून हळदीला दर चांगले असल्याने शेतकऱ्यांनी दराची स्थिती पाहूनच विक्री केली आहे.
दरवर्षी हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात हळदीची २० ते २५ लाख पोती शिल्लक राहतात. परंतु या वर्षी दर चांगले असल्याने हळद फारशी शिल्लक राहणार नाही, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांनी उच्च प्रतीची हळद विक्री केली आहे. त्यामुळे अशा हळदीची आवक बाजारात फारशी येत नाही. येत्या काळात हळदीच्या दरात फारशी तेजी-मंदी होण्याची चिन्हे दिसत नसल्याचा अभ्यासकांचा अंदाज आहे.

बियाणे दरात वाढ
गेल्या वर्षी अपुरा पाऊस झाल्याने हळदीचे बियाणाचे उत्पादनही कमी झाले आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत बियाण्याच्या दरात वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये हळद बियाण्याचा दर ६००० ते ७००० रुपये क्विंटल होता. या दरम्यान शेतकऱ्यांनी हळदीचे बियाणे खरेदी केले होते. परंतु पाण्याची कमतरता असल्याने शेतकऱ्यांनी हळद बियाणे खरेदी थांबविली होती. गेल्या पंधरा दिवसांत सांगली आणि सातारा जिल्ह्यात पूर्वमोसमी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी हळद बियाणे खरेदीसाठी पुन्हा पुढाकार घेतला आहे. सध्या हळद बियाण्याचे ८००० ते ९००० रुपये प्रतिक्विंटल आहेत. सांगली बाजार समितीत शनिवारअखेर (ता. २५) ६० ते ७० गाडी (एक गाडी १७ टनांची) हळद बियाणे विक्री झाली आहे.


हळदीचे प्रतवारीनुसार दर (प्रतिक्विंटल)
पावडर क्वालिटी...१७२०० ते १८०००
कणी एक नंबर...१६००० ते १६५००
कणी दोन नंबर...१५७०० ते १५९००
मध्यम...१८२०० ते १८५००
लगडी...२०००० ते २१०००

देशातील हळद विक्रीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. आवक मंदावली असून हळद कणी एक व दोन प्रतींच्या दरात वाढ झाली आहे. सध्या हळदीचे दर टिकून आहेत.
- गोपाळ मर्दा, हळद व्यापारी, सांगली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT